डोंबिवली, 04 डिसेंबर : ज्याची भिती वर्तवली जात होती अखेर कोरोनाचा (corona) नवा घातक व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) महाराष्ट्रात (maharashtra) शिरकाव केला आहे. दक्षिण आफ्रिकेवरून 24 नोव्हेंबर रोजी आलेला तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह (omicron positive) आढळला आहे. धक्कादायक म्हणजे, या तरुणाने कोरोनाची लस घेतलेली नाही. तरीही हा तरुण विदेशवारी करून आला आहे. 24 नोव्हेंबर रोजी हा रुग्ण आफ्रिकेहून डोंबिवलीत आला होता, त्याची चाचणी घेण्यात आली असता कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्या व्यक्तीसोबत असलेल्या प्रवाशाची चाचणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आणि त्याचा अहवाल सुदैवाने निगेटिव्ह आला. यासोबतच त्याच्या तीन नातेवाईकांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती आणि त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती कल्याण डोंबिवली साथरोग नियंत्रण आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. धक्कादायक म्हणजे, हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहे. पण त्याचे कोरोना लसीकरण झाले नाही. असं असून सुद्धा त्याने विमानाने प्रवास केला आणि लसीकरण न झाल्याने हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे वरीष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेली ७ महिने हा तरुण कामानिमित्त अनेक देशात फिरला असून मर्चंट नेव्हीत असल्याने तो सतत समुद्रात प्रवास करत असल्याने लसीकरण झाले आहे की नाही याबाबत त्याला कधीच विचारणा झाली नाही. तसंच लसीकरण करण्यात अडचणी देखील होत्या, अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगर पालिका आरोग्य विभागाला मिळाली.
A 33-year-old person from Kalyan-Dombivli who recently returned from South Africa found positive for #Omicron variant of #COVID19: State Health Department
— ANI (@ANI) December 4, 2021
This is the first case of the variant in Maharashtra and the fourth in the country.
या तरुणाने केपटाऊनहुन दुबई आणि दुबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा विमानाने प्रवास केला आहे. मुंबई ते डोंबिवली तो ओला कारने आला होता. या रुग्णाने दिल्लीत कोरोना टेस्ट केली होती. मात्र मुंबईत आल्यानंतर त्याला तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर डोंबिवलीमध्ये चाचणी केली असता ती देखील पॉझिटिव्ह आढळून आली. रुग्णाने प्रवास केलेल्या विमान आणि ओला कारची माहिती केडीएमसीने शासनाला दिली होती. रुग्णाचे 8 नातवाईकांची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यामधील सगळ्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती. या तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवला होता. अखेर आज त्याचा रिपोर्ट समोर आला असून त्यात ो ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे राज्य आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.