मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

2 महिने प्रतीक्षा करण्याची गरज नाही; मुंबईकरांना 2-4 दिवसांतच समजणार कोरोनाचं बदलतं रूप

2 महिने प्रतीक्षा करण्याची गरज नाही; मुंबईकरांना 2-4 दिवसांतच समजणार कोरोनाचं बदलतं रूप

पुणे, नगरनंतर आता मुंबईतही Corona Genome Sequencing; नेमका काय होणार फायदा?

पुणे, नगरनंतर आता मुंबईतही Corona Genome Sequencing; नेमका काय होणार फायदा?

पुणे, नगरनंतर आता मुंबईतही Corona Genome Sequencing; नेमका काय होणार फायदा?

मुंबई, 04 ऑगस्ट : कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट (Corona delta variant) आणि कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) याचा धोका यादरम्यान मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबईतच कोरोनाचं जिनोम सिक्वेन्सिंग (Genome sequencing) होणार आहे. त्यामुळे कोरोनाचं बदललेलं रूप (Corona variant)  मुंबईकरांसमोर लवकरात लवकर येणार आहे (Genome sequencing in Mumbai) .

आतापर्यंत कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट (Corona mutation)  तपासणीसाठी नमुने पुण्याच्या एनआयव्हीला पाठवले जात होते. पण आता  मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग केलं जाणार आहे. अमेरिकेहून साडेसहा कोटींचं अत्याधुनिक जिनोम सिक्वेन्सिंग मशीन आणलं गेलं आहे.

"कोरोना व्हेरियंट तपासणीसाठी नमुने पुण्याच्या एनआयव्हीला पाठवण्याची गरज नाही. आता कस्तुरबा रूग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग मशीन बसवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मशीनचे उद्घाटन करण्यात आलं आहे", अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

हे वाचा - Explainer : Covishield लस कितपत प्रभावी? काय सांगतो जगातला सर्वात मोठा अभ्यास?

कस्तुरबा रुग्णालयातील मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लेबोरेटरीचे प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी सांगितलं की, "यापूर्वी पुण्याला चाचणीसाठी सॅम्पल पाठवल्यानंतर रिपोर्टसाठी लागणारे तब्बल दोन महिन्यांचंं वेटिंग आता संपणार आहे. या लॅबमुळे दोन ते चार दिवसांत डेल्टा चाचणी अहवाल मिळणार आहे"

जीनोम सिक्वेसिंग म्हणजे काय?

प्रत्येक जीवाच्या शरीराची जनुकीय साखळी ठरलेली असते. त्या साखळीत काही बदल झाला, तर संबंधित जीवाच्या वैशिष्ट्यांतही बदल होतो. जनुकीय साखळीतला हा बदल जीनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून ओळखता येतो. जीनोम सिक्वेन्सिंगला जनुकीय साखळी उलगडणं असं म्हणतात.

जीनोम सिक्वेसिंगचा फायदा काय?

विषाणूच्या जनुकीय संरचनेमधले हे बदल, त्याची वैशिष्ट्यं, हल्ला करण्याची पद्धत वगैरे सगळी माहिती जीनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून कळते. ही नवनवी रूपं समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ कोरोनाबाधितांच्या शरीरातून नमुने घेऊन त्यातून विषाणूचं जीनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) करत आहेत.

हे वाचा - सावधान! कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही; 'हे' राज्य वाढवतायेत चिंता

विषाणूला प्रतिकार किंवा प्रतिबंध करणारी औषधं/लशी तयार करताना त्याच्या जनुकीय संरचनेचा (genetic Makeup) अभ्यास केलेला असतो. त्यातल्या कमकुवत बाजू अभ्यासून त्यांची निर्मिती केलेली असते; मात्र म्युटेशनमुळे तयार झालेल्या नव्या व्हेरिएंट्सच्या कमकुवत बाजूंमध्ये बदल झालेला असू शकतो. त्यामुळे आधीच्या व्हेरिएंटसाठी तयार केलेलं औषध किंवा लस यांचा प्रभाव नव्या व्हेरिएंटवर पडेलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळेच जीनोम सिक्वेन्सिंगचा वापर करून त्या नव्या व्हेरिएंटचा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्या कमकुवत बाजू जाणून घ्याव्या लागतात.

कसं केलं जातं जीनोम सिक्वेन्सिंग?

यासाठी कोरोना रुग्णाच्या शरीरातून विषाणूचा नमुना घेतला जातो. प्रयोगशाळेत शक्तिशाली कॉम्प्युटरच्या सहाय्याने विषाणूचं जीनोम सिक्वेन्सिंग केलं जातं. त्यातून शास्त्रज्ञांना समजतं, की म्युटेशन नेमकं कुठे झालं आहे. हे म्युटेशन स्पाइक प्रोटीनमध्ये झालं असेल, तर ते जास्त घातक ठरू शकतं. कारण त्यामुळे विषाणूची हल्ला करण्याची क्षमता, संसर्ग करण्याची क्षमता वाढू शकते. स्पाइक प्रोटीन ही कोरोना विषाणूच्या शरीरातली अशी काटेरी रचना आहे, की जिच्या साह्याने विषाणूचा मानवी शरीरातल्या पेशीमध्ये प्रवेश सुकर होतो.

देशातल्या कुठे कुठे होतं जीनोम सिक्वेन्सिंग?

इन्स्टिट्यूट ऑफ जीनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (नवी दिल्ली)

सीएसआयआर-आर्किऑलॉजी फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (हैदराबाद)

डीबीटी - इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेस (भुवनेश्वर)

डीबीटी-इन स्टेम-एनसीबीएस (बेंगळुरू)

डीबीटी - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनॉमिक्स (NIBMG)

आयसीएमआर - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (पुणे)

याशिवाय गेल्या महिन्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अहमदनगरमध्येही जीनोम सिक्वेसिंग कऱण्याचे निर्देश दिले होते.

First published:

Tags: Coronavirus