मुंबई, 05 एप्रिल : राज्यातील कोरोना (Coronavirus In Maharashtra) रुग्णांचा भरभर वाढत जाणारा आकडा सोमवारी काही प्रमाणात घसरला होता. अगदी 50 हजारच्या खाली नव्या कोरोना रुग्णांची नोंद (Maharashtra Coronavirus cases) झाली होती. पण दुसऱ्याच दिवशी हा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. राज्यात पुन्हा 50 हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय चिंताजनक म्हणजे रिकव्हरी रेट कमी झाला आहे आणि पॉझिटिव्ह रेट वाढला आहे.
राज्यात आज दिवसभरात 55,469 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 31,13,354 वर पोहोचला आहे. राज्यातील पॉझिटिव्हीटी रेट हा 14.88 टक्के आहेत. तर दिवसभरात 34,256 रुग्णांसह एकूण 25,83,331 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. त्यानंतर राज्यातील रिकव्हरी रेट 82.98% झाला आहे. 5 एप्रिलच्या आकडेवारीशी तुलना करता रिकव्हरी रेट कमी झाला असून पॉझिटिव्ह रेट वाढला आहे.
Maharashtra reports 55,469 new COVID cases, 34,256 recoveries, and 297 deaths in the last 24 hours
Total cases: 31,13,354 Active cases: 4,72,283 Total recoveries: 25,83,331 Death toll: 56,330 pic.twitter.com/j1PTwmpK1E — ANI (@ANI) April 6, 2021
शिवाय राज्यातील मृत्यूचा आकडाही भयावह आहे. दिवसभरात 297 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.81% एवढा आहे. तर एकूण 4,72,283 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हे वाचा - राज्यात 3 दिवस इतकाच लसीकरणाचा साठा, राजेश टोपेंनी केंद्राकडे मागितली मदत
कोरोनाची दुसरी लाट अधिक संसर्गजन्य आहे पण गंभीर नाही, असं महाराष्ट्राच्या कोव्हिड 19 टास्क फोर्सचे सदस्य शशांक यांनी सांगितलं. कोरोनाची प्रकरणं दोन ते चार आठवड्यांतच कमी होऊ शकतात. पण त्यासाठी लोकांनी कोरोनासंबंधी नियमांचं नीट पालन करायला हवं. लसीकरणामुळे आजार आणि मृत्यूपासून संरक्षण मिळेल पण संसर्गापासून नाही, असं त्यांनी सांगितलं.
हे वाचा - ...म्हणून सर्वांना कोरोना लस देत नाही; उद्धव यांच्या मागणीनंतर केंद्राचं उत्तर
प्रशासनाने जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्याचा प्रयत्न करावा. पुढील तीन ते सहा महिन्यात लशीचे बरेच पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतील. सध्याच्या लशी या जवळपास 12 महिने प्रतिकारक शक्ती देते. असं ते म्हणाले. राज्यातील कोरोना प्रकरणं वाढत आहेत, यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊन आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. पण आरोग्य व्यवस्थ आधीपेक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus