धारावीतल्या 7 लाख 50 हजार लोकांचं 10 दिवसांमध्ये स्क्रिनिंग होणार

धारावीतल्या 7 लाख 50 हजार लोकांचं 10 दिवसांमध्ये स्क्रिनिंग होणार

यात 2 खाजगी डॉक्टरांबरोबर दोन बीएमसी चे डॉक्टर आणि एक सहाय्यक अशा पाच जणांच्या टीम्स तयार केल्या जणार आहेत.

  • Share this:

मुंबई 09 एप्रिल : देशात महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत आणि महाराष्ट्रात मुंबईमध्ये. मुंबईतली धारावी झोपडपट्टी हॉटस्पॉट ठरली आहे. प्रचंड गर्दी आणि दाटीवाटीत असलेली घरं यामुळे तिथे लागण झपाट्याने होत असल्याचं दिसून आलंय. ही लागण वेळीच रोखण्यासाठी आणि परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून मुंबई महानगरपालिका स्पेशल प्लान तयार करत आहे.

या प्लानबाबत मुंबई महापालिकेचे अधिकारी, खासदार राहुल शेवाळे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानुसार ही योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशन दीडशे डॉक्टर देणार आहे. त्यांच्या मदतीने संपूर्ण धारावीतील लोकांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे.

यात 2 खाजगी डॉक्टरांबरोबर दोन बीएमसी चे डॉक्टर आणि एक सहाय्यक अशी पाच जणांची एक टीम तयार केली जाणार आहे. अशा टीम्स तयार करून त्या 10 दिवसांमध्ये धारावीतल्या साडेसात लाख रहिवाशांचं स्क्रिनिंग करणार आहेत.

 हे वाचा - धारावीत कोरोनाचा तिसरा बळी; मुंबईचा सगळ्यात धोकादायक हॉटस्पॉट

यात लक्षणं आढळणाऱ्या लोकांना धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आयसोलेशनसाठी ठेवण्यात येणार आहे. तर ज्यांना ठळकपणे लक्षणे दिसून येतील त्यांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जाणार आहेत. ज्या भागात जास्त संशयित आढळतील तो भाग हळूहळू पूर्णपणे बंद करण्यात येईल. ड्रोन च्या मदतीने संपूर्ण धारावीचे सॅनेटायझेशन करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

कोरोनाचा प्रकोप देशात वाढतो आहे. दररोज रुग्णांच्यां संख्येत मोठी वाढ होत आहे. मृत्यूची संख्याही वाढतो आहे. कोरोना विरुद्धची लढाई ही दिर्घकाळ लढावी लागेल असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार दिले आहेत. कोरोनाचा माणसांच्या दररोजच्या आयुष्यावर मोठा परिणाम होईल असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. ही मोठी लढाई असल्याने त्याविरुद्ध लढण्यासाठी मोदी सरकारने एक ‘मास्ट प्लान’ तयार केला आहे. तीन टप्प्यात त्याची अमंलबजावणी होणार आहे.

 हे वाचा - #Coronavirusupdates: महाराष्ट्र दिनाची परेड रद्द, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

कोरोना व्हायरस हा सर्व जगासाठीच नवा असल्याने त्याविरुद्ध कसं लढायचं यावर प्रयोग सुरू आहेत. कुठलाही ठोस पर्याय किंवा औषध नसल्याने विविध प्रयोग करण्यात येत आहेत. मोदी सरकारही ही योजना तीन टप्प्यात असून त्याचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे. याबाबतच वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे.

पहिला टप्पा - जानेवारी 2020 ते जून 2020

दुसरा टप्पा- -जुलै 2020 ते मार्च 2021

तिसरा टप्पा - एप्रिल 2021 ते मार्च 2024

 

First published: April 9, 2020, 5:18 PM IST
Tags: dharavi

ताज्या बातम्या