प्राण्यांमध्येही पसरत आहे Coronavirus, पेट्सच्या देखभालीसाठी WHOच्या सूचना
काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरस हा फक्त माणसांमध्ये पसरणारा रोग आहे असं मानलं जात होतं. पण अमेरिकेत एका वाघाला कोरोनाचं संक्रमण झाल्याचं लक्षात आल्यावर खळबळ उडाली.
|
1/ 8
2/ 8
न्यूयॉर्क शहरातील या प्राणी संग्रहालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं नंतर लक्षात आलं. माणसांपासून प्राण्यांना व्हायरसचं संक्रमण होण्याची ही पहिलीच केस आहे.
3/ 8
या नंतर पाळीव प्राण्यांना या व्हायरसचा कितपत धोका आहे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. ज्यावर WHO नं पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी हे सांगितलं आहे.
4/ 8
WHO नं सांगितल्याप्रमाणे पाळीव प्राण्याना हात लावण्यापूर्वी तुमचे हात साबणानं स्वच्छ धुवा जेणेकरुन हातावरील बॅक्टेरिया प्राण्यांच्या संपर्कात येणार नाहीत.
5/ 8
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या (CDC) रिपोर्टनुसार कोरोना व्हायरचे अनेक प्रकार आहेत. ज्यापैकी काहींचं संक्रमण प्राण्यांना होण्याची शक्यता आहे.
6/ 8
घरात किंवा आसपास कोरोना संक्रमित व्यक्ती असेल तर घरातील एका जबाबदार व्यक्तीनं पाळीव प्राण्यांची जबाबदारी घ्यायला हवी जेणेकरुन ते कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही.
7/ 8
आजारी व्यक्तीनं पाळीव प्राण्यांना हात लावून नये, त्यांना जवळ घेऊ नये किंवा त्यांना आपलं उष्टं अन्न सुद्धा खायला देऊ नका.
8/ 8
घरातील पाळीव प्राण्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. तसेच प्राण्यांच्या जवळ जाण्यापूर्वी तोंडाला मास्क लावावा. (संकलन : मेघा जेठे.)