मुंबई, 2 जून : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात कोरोना (Corona in Maharashtra) बाधितांच्या संख्येत वाढ (Spike in corona cases) होताना दिसून येत आहे. बुधवारी (1 जून) राज्यात तब्बल 1 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई मनपा प्रशासन सुद्धा सतर्क झाले असून पुन्हा जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यास सज्ज झाले आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याची तसेच मास्क सक्तीची शक्यता (possibility of strict restrictions and mask compulsory) वर्तवण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं, सर्वांच्याच लक्षात आलं असेल की कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही काल थोडी चर्चा झाली. कोरोना बाधितांची संख्या वाढणं हे काळजी करण्यासारखं वातावरण आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या जर वाढत गेली तर नंतर कशा प्रकारे हाताबाहेर जाते हे पिहल्या लाटेत, दुसऱ्या लाटेत सर्वांनी पाहिलं आहे.
आम्ही, सार्वजनिक आरोग्य विभाग, टास्क फोर्स, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. जर कोरोना बाधितांची संख्या वाढली तर कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता वाढत चालली आहे. 1 जून रोजी राज्यामध्ये कोरोनाबाधित नवीन रुग्णाची संख्या 1081 आढळली आहे. एकाच दिवसामध्ये ही रुग्ण संख्या आढळली आहे. तर राज्यभरात एकूण 4032 ॲक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर बुधवारी 524 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तसंच राज्यात एकही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 77,36,275 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.07% एवढे झाले आहे.
मुंबई महापालिकेनं 1 जून रोजी दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांमध्ये बाधित रुग्णांची संख्या 739 आढळून आली आहे. तर 24 तासांमध्ये बरे झालेले रुग्णांची 295 आहे. आतापर्यंत एकूण 1044005 रुग्ण बरे झाले आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 98 टक्के आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही 2979 इतकी आहे. कोविड वाढीचा दर हा 25 ते 31 मे या कालावधीमध्ये 0.033 टक्के इतका होता.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर पालिकेचे नवे निर्देश
मुंबईतील कोरोना टेस्टची संख्या वाढवणार
12 ते 18 वयोगटातील लसीकरण वाढवावे
बुस्टर डोसची संख्या वाढवावी
जम्बो कोविड सेंटर पुन्हा सज्ज करावेत
मालाडचे जम्बो कोविड सेंटर प्राधान्यानं सज्ज होणार
वॉर्ड वॉर रुम पुन्हा एकदा सक्रीय होणार
खाजगी रुग्णालयांनाही अलर्ट
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रुग्णालयात आपातकालिन स्थितीची सज्जता आहे की नाही याबाबतचा आढावा घेतला जाईल
मास्कबाबत टास्क फोर्स कडून निर्देश येईपर्यंत अद्याप कोणताही निर्णय नाही
वॉर्डच्या प्रभारी सहाय्यक समितीने वॉर्ड वॉर रूम पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे जेणेकरून ते कर्मचारी, वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिकांनी सुसज्ज ठेवा
खाजगी रुग्णालयांनी सतर्कता बाळगली पाहिजे.
येत्या काही दिवसांत हॉस्पिटलायझेशन वाढल्यास मालाड जम्बो प्राधान्याने सुरू करण्यात येईल.
प्रभागांच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या प्रभागातील कोविड परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेणे आवश्यक आहे आणि आवश्यक तेथे ठोस हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.
पालिका आयुक्त पावसाळ्यासाठी तयार आहेत. का हे पाहण्यासाठी जम्बो रुग्णालयांना भेट देतील जेणेकरून ते डी-वॉटरिंग पंप, स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र, अग्निसुरक्षा यंत्रणा, हाऊस किपिंग, कॅटरिंग, पॅरामेडिकल आणि वैद्यकीय कर्मचारी, O2 उत्पादन संयंत्रे आणि औषधांसह पूर्णपणे सुसज्ज आहेत हे सुनिश्चित करण्यात येणार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Corona updates, Coronavirus, Face Mask, Maharashtra News, Mumbai