मुंबई, 20 एप्रिल: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मद्यपींसाठी एक खूशखबर दिली आहे. ती, म्हणजे राज्यात वाईन शॉप लवकरच सुरु होऊ शकतात, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंच्या नियमांचं योग्य पालन केल्यास वाईन शॉपवर कोणतीही बंदी असणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्ह आणि झूम अॅपच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. एका प्रश्नाला उत्तर देताना राजेश टोपे यांनी राज्यात वाईन शॉप सुरु करण्याबाबत संकेत दिले. हेही वाचा.. राज्यात 75 हजार रॅपिड टेस्ट करण्यास अखेर केंद्र सरकारची मान्यता दरम्यान, देशासह राज्यात 3 मेपर्यत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. जीवनाश्यक वस्तू वगळता राज्यात सर्व गोष्टींवर निर्बंध घालण्यात आली आहे. त्यात हॉटेल, बियर बार आणि वाईनशॉपचा समावेश आहे. मात्र, 20 एप्रिलनंतर संचारबंदी शिथिल करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं आहे. याकाळात अनेक गोष्टींना सूट देण्यात आली आहे. त्याची यादी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. मात्र बंदी असलेल्या यादीत दारुच्या दुकानांचा उल्लेख नाही. तसंच ते कधी सुरु होणार याबाबतही खुलासा करण्यात आलेला नाही. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रश्न करण्यात आला होता. दरम्यान, कोरोनाची लक्षणं लपवून ठेऊ नका. कारण लक्षणं न दिसताही कोरोना रुग्ण सापडत आहे. थोडीशी जरी लक्षणं आढळली तर तातडीने डॉक्टरांकडे जा, स्वत:साठी इतरांना धोक्यात टाकू नका, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मीच माझा रक्षक… मी कोरोनाला हरवणारच, असं सांगत आरोग्यमंत्र्यांनी जनतेचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा… कोरोनाची लक्षणं लपवून इतरांना धोक्यात टाकू नका, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
संपादन- संदीप पारोळेकर