Home /News /mumbai /

नाशिकनंतर ठाण्यात Delta Variant चा शिरकाव; 4 रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क

नाशिकनंतर ठाण्यात Delta Variant चा शिरकाव; 4 रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क

नाशिक, मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही डेल्टा संसर्गाचा शिरकाव झाल आहे.

नाशिक, मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही डेल्टा संसर्गाचा शिरकाव झाल आहे.

Delta Variant Cases in Thane: आता कुठेतरी महाराष्ट्र राज्य कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून (Corona Virus 2nd wave) सावरत आहे. तोपर्यंत आता कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचं नवं संकट राज्यासमोर उभं ठाकलं आहे. नाशिक, मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही डेल्टा संसर्गाचा शिरकाव झाल आहे.

पुढे वाचा ...
ठाणे, 09 ऑगस्ट: आता कुठेतरी महाराष्ट्र राज्य कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून सावरत आहे. तोपर्यंत आता कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचं नवं संकट राज्यासमोर उभं ठाकलं आहे. नाशिक, मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही डेल्टा संसर्गाचा (Delta variant) शिरकाव झाल आहे. ठाण्यात (Thane) आज डेल्टा संसर्गाची बाधा झालेले चार रुग्ण आढळले आहेत. संबंधित सर्व रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण आढळल्यानंतर ठाणे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. आज ठाणे परिसरात आढळलेल्या एकूण चार डेल्टा व्हेरिअंट बाधित रुग्णांमध्ये 25 वर्षांखालील 3 रुग्ण आहेत, तर एक रुग्ण 53 वर्षांचा आहे. नाशिक आणि मुंबई पाठोपाठ ठाण्यात डेल्टा व्हेरिअंटने धडक घेतल्यानं नागरिकांमध्ये भीतीच वातावरण तयार झालं आहे. पण नागरिकांनी काळजी करण्याचं काहीही कारण नाही, कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेशी आणि डेल्टा व डेल्टा प्लस व्हेरिअंटशी लढण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिली आहे. हेही वाचा-Covishield आणि Covaxin चा मिक्स डोस अधिक प्रभावी? काय सांगतो ICMR चा अभ्यास कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिअंट हा कोरोना विषाणूचाच प्रकार असला तरी, हा व्हेरिअंट अन्य व्हेरिअंटच्या तुलनेत जास्त संसर्गजन्य आहे. तसेच या व्हेरिअंटची बाधा झाल्यास रुग्णाला तातडीनं लक्षणं दिसायला सुरू होतात. त्यामुळे आपल्यासोबत आपल्या कुटुंबीयांचं देखील आरोग्य धोक्यात येतं. प्रशासनानं कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सर्व तयारी केली असली तरी, आपल्या प्रियजनांना डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग होऊ नये त्यासाठी सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असंही डॉ. पवार यांनी सांगितलं आहे. हेही वाचा-डेल्टाहून अधिक प्राणघातक व्हेरिअंट येऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांच मत कोरोना विषाणूच्या लढ्यात चतुःसूत्री अत्यंत महत्त्वाची असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. चतुःसूत्री अर्थातच मास्क, सोशल डिस्टन्सिंग, लसीकरण आणि सॅनिटायझेशन हे चार नियमांच काटेकोर पालन करण्याच आवाहन डॉ. पवार यानी केलं आहे. संबंधित चार रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक आणि मित्र परिवार यांच्याशी संपर्क साधून त्यांची चाचणी केली जात आहे. अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Corona patient, Thane

पुढील बातम्या