मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईकरांनो कोरोना लस घेण्यापूर्वी वाचा ही बातमी; BMC ने दिली महत्त्वाची अपडेट

मुंबईकरांनो कोरोना लस घेण्यापूर्वी वाचा ही बातमी; BMC ने दिली महत्त्वाची अपडेट

मुंबई महापालिकेने (BMC) लसीकरणाबाबत (Corona vaccination) मोठी माहिती दिली आहे.

मुंबई महापालिकेने (BMC) लसीकरणाबाबत (Corona vaccination) मोठी माहिती दिली आहे.

मुंबई महापालिकेने (BMC) लसीकरणाबाबत (Corona vaccination) मोठी माहिती दिली आहे.

    मुंबई, 02 जून :  मुंबईकरांनो उद्या (03 जून, 2021) तुम्ही कोरोना लस (Corona vaccine) घेण्याच्या तयारीत असाल. उद्या कोरोना लस  (Corona vaccination) घ्यायला जाणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेने (BMC) लसीकरणाबाबत मोठी माहिती दिली आहे. उद्या मुंबईतील लसीकरण (Corona vaccination in mumbai) बंद असणार आहे, असं बीएमसीने सांगितलं आहे. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नाही आहे.  त्यामुळे 03 जून, 2021 मुंबईत लसीकरण होणार नाही. असं बीएमसीने जारी केलं आहे. त्यामुळे मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवरील लसीकरण बंद राहणार आहे. उद्या दिवसभरामध्ये लससाठा प्राप्त होण्याची शक्यता आहे. लस साठा उपलब्ध झाल्यास पुढील दिवसापासून लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. हे वाचा - दर तासाला 28 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर; मे 2021 महाराष्ट्र कधीच नाही विसरणार लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने कळवलं जाईल, असं बीएमसीने सांगितलं आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही बीएमसीने केलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: BMC, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Mumbai

    पुढील बातम्या