मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दर तासाला 28 कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर; मे 2021 महाराष्ट्र कधीच नाही विसरणार

दर तासाला 28 कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर; मे 2021 महाराष्ट्र कधीच नाही विसरणार

फोटो-प्रतिकात्मक

फोटो-प्रतिकात्मक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मे महिन्यात महाराष्ट्रात मृत्यूचं थैमान दिसून आलं.

    मुंबई, 02 जून : मे 2021 कोरोना काळात महाराष्ट्रासाठी मृत्यूचा (Coronavirus in Maharashtra) महिना ठरला असं म्हण्यास हरकत नाही. या महिन्यात राज्यात मृत्यूतांडव (Corona patient death in Maharashtra) होतं. दर तासाला 28 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कुणी आपली आई, कुणी बाबा, कुणी बहीण, कुणी भाऊ, कुणी मुलगा, कुणी मुलगी गमावली. फक्त या कुटुंबासाठीच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येकाला हा महिना कायम लक्षात राहिल. त्सुनामी, भूकंप, पूर, चक्रीवादळ यासारखाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या (Corona second wave in Maharashtra)  प्रकोपामुळे हा महिना कधीच विसरता येणार नाही. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा घसरला आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. नवीन रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत आहेत. हा मोठा दिलासा आहे. पण याचवेळी राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या बाजूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्या मे महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा प्रमाण कमी झालं आहे. त्याच मे महिन्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. राज्य सरकारने कोरोनाचा रिपोर्ट जारी केला आहे. हा रिपोर्ट खूपच भयावह आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात लक्षणीयरित्या वाढलेले रुग्ण आणि मे महिन्यात कमी झाले. पण त्याच वेळी मृत्यूचा आकडा मात्र कमी झालेला नाही. तो मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे वाचा - कोरोनामधील बेवारस मृतदेहांचे मंत्र्यांकडून अस्थी विसर्जन, पाहा PHOTOS राज्याच्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये 17,89,406, तर  मे महिन्यात 11,55,570 रुग्णांची नोंद झाली. हा आकडा पाहून थोडंसं हायसं वाटत असतानाच मृत्यूच्या आकड्याने हादरवूनच टाकलं आहे. एप्रिल महिन्यात मे महिन्यापेक्षा सर्वात जास्त रुग्ण आढळूनही 13,835 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावेळी मृत्यूदर 0.77 टक्के होता. पण मे महिन्यात एप्रिलपेक्षा कमी रुग्णसंख्या असताना 20,801 मृत्यूची नोंद झाली. यासोबतच मृत्यूदर 1.80 टक्क्यांवर पोहोचला. हे वाचा - आयुर्वेदाच्या मदतीने 600 रुग्ण कोरोनामुक्त; रामदेव बाबा-IMA वादावेळी मोठी अपडेट आकड्याचं विश्लेषण करता, दर दिवशी सरासरी 671 आणि प्रति तास सरासरी 28 कोरोना रुग्णांचा जीव गेला आहे. महाराष्ट्रासाठी ही खूप चिंताजनक बाब आहे. याचा अर्थ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणाऱ्या महाराष्ट्रासमोर आता मृत्यूला रोखण्याचं मोठं आव्हान आहे.
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Maharashtra, Maharashtra News

    पुढील बातम्या