मुंबई 19 मे: कोरोनाची स्थिती सरकारच्या ताब्यात आहे. १ लाख बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. मात्र असं असलं तरी घाबरण्याचे कारण नाही. सरकारी हॉस्पिटल्समधली 80 टक्के बेड्स सरकारने ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी आज दिली. लॉकडाऊनच्या काळात सरकारने आता अनेक गोष्टींमध्ये मोकळीक दिली आहे. मात्र प्रतिबंधित भागात कुठलीही सवलत दिली जाणार नाही असंही ते म्हणाले. लोकांनी न घाबरता आपलं दैनंदिन जीवन सुरू करावं. कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे असंही ते म्हणाले. आपली प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. ते म्हणाले, मृत्यूदर कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे दिर्घकाळ चालणारं संकट असल्याने लोकांनी घाबरून चालणार नाही. धीराने आणि धैर्याने त्यांनी मुकाबला केला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 84 कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 1353 झाली आहे. वादळी पावसाने 4 महिन्यांच्या चिमुकलीचा घेतला जीव, 100 फुटांवर उडाला पाळणा कोरोनाला रोखण्यासाठी देशात सध्या चौथ्या टप्प्याचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये रेड, ऑरेंज, ग्रीन आणि कन्टेंन्मेंट झोनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. यात धर्तीवर आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनेही लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या लाँकडाऊन मधील नवीन नियमावली राज्यसरकारने केली जाहीर. बोनी कपूर यांच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना, वडीलांसह जान्हवी-खुशी क्वारंटाइन राज्यात आता तीन झोन केले आहेत. यात 1) कंटेनमेंट झोन, 2) रेड झोन, 3) नाँन रेड झोन असतील. ही नियमावली मुंबई, नवी मुंबई, पुणे (शहर), सोलापूर (शहर), औंरंगाबाद (शहर), मालेगाव, धुळे, नाशिक (शहर), जळगाव, अकोला आणि अमरावती हे परिसर रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान रात्री 7 ते सकाळी 7 दरम्यान कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. रेड झोनच्या बाहेर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बस, टॅक्सी वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.