सोशल मीडियावर चाहत्यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर बोनी कपूर म्हणाले, "माझी मुलं माझ्यासोबत आहेत आणि ते सर्व ठिक आहेत. माझे इतर कर्मचारीही ठिक आहेत. आतापर्यंत आमच्यापैकी कोणामध्येही कोरोनाची लक्षणं दिसली नाहीत. विषेश म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासूनच आम्ही आमच्या घरात आहोत. आम्ही घराबाहेर गेलोच नव्हतो" हे वाचा - 'मला रोज जाणीव करुन दिली जाते...' घटस्फोटावर नवाझुद्दीनच्या पत्नीनं सोडलं मौन मिळालेल्या माहितीनुसार, बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या या व्यक्तीची प्रकृती शनिवारपासून बिघडत होती. त्यानंतर बोनी कपूर यांनी त्याला तात्काळ टेस्ट करण्यासाठी पाठवलं. टेस्ट केल्यानंतर त्याला क्वारंटाइन करण्यात आलं होतं. टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर बोनी कपूर यांनी सोसायटी, बीएमसी, सरकारला याची माहिती दिली. या कर्मचाऱ्याला आता राज्य सरकारच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. हे वाचा - आर्थिक तंगीमुळे अभिनेत्यावर आली फळं विकायची वेळ, आयुष्मानसोबत केलं आहे काम बोनी कपूर म्हणाले, "आम्ही मेडिकल टीममार्फत देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करत आहोत. महाराष्ट्र सरकार आणि बीएमसीनं तात्काळ आमच्याकडे लक्ष दिलं, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मला पूर्ण विश्वास आहे ती माझ्या घरात काम करणारा चरणही लवकर ठिक होईल"View this post on InstagramStaying at home is still the best solution we have. Stay safe everyone 🙏🏻
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus