नॉटिंघम, 13 जून : इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातल्या नॉटिंघममध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसनने (James Anderson) इतिहास घडवला आहे. अंडरसनने टेस्ट क्रिकेटमध्ये 650 विकेट पूर्ण केल्या आहेत. नॉटिंघम टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथमला (Tom Latham) बोल्ड करून हा विक्रम केला. 145 वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात 650 विकेट घेणारा अंडरसन पहिलाच फास्ट बॉलर आहे. तर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरच्या यादीत अंडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याच्यापुढे शेन वॉर्न (Shane Warne) आणि मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) आहेत. मुरलीधरनच्या नावावर 133 टेस्टमध्ये 800 विकेट आणि वॉर्नच्या नावावर 145 टेस्टमध्ये 708 विकेट आहेत.
जेम्स अंडरसननंतर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या फास्ट बॉलरमध्ये ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा आहे. मॅकग्राने 124 टेस्टमध्ये 563 विकेट घेतल्या होत्या. मॅकग्राचं हे रेकॉर्ड अंडरसनचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉड तोडण्याच्या मार्गावर आहे. ब्रॉडने आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये 543 विकेट आहेत. अंडरसनने लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या टेस्टमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्या सामन्यात अंडरसनने 6 विकेट घेतल्या होत्या.
The perfect start and Test wicket number 6️⃣5️⃣0️⃣ for @jimmy9 Scorecard & Videos: https://t.co/GJPwJC59J7 #ENGvNZ pic.twitter.com/PLFNZU6P2k
— England Cricket (@englandcricket) June 13, 2022
अंडरसनने टेस्ट करियरमध्ये आतापर्यंत 31 वेळा 5 आणि 3 वेळा 10 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक टेस्ट विकेट घेणाऱ्या मुरलीधरनने 67 वेळा 5 विकेट घेतल्या होत्या. अंडरसन सर्वाधिक टेस्ट खेळणारा बॉलरही आहे. न्यूझीलंडविरुद्ध नॉटिंघममध्ये तो 171वी टेस्ट खेळत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 36 हजारांपेक्षा जास्त बॉल टाकले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: England, James anderson