मुंबई, 1 एप्रिल : देशभरात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या 1700 पार गेली आहे. दिल्लीतील (Delhi) मर्कझ येथे झालेल्या परिषदेनंतर देशभरात कोरोना (Covid - 19) पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान मुंबईतून एक भीती वाढवणारी बातमी समोर आली आहे. आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. आज दुपारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत तब्बल 5000 जण क्वारंटाइनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. त्यातच आता सर्वाधिक कोरोना पसरले अशी भीती असलेल्या धारावीत कोरोनाग्रस्त आढळून आल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
संबंधित - CBSE : 1 ली ते 8 वीपर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढल्या वर्गात प्रवेश धारावीत लाखो लोक दाटीवाटीने राहतात. येथील घरांचा आकार लहान असल्याने सोशल डिस्टन्सिंग ठेवणं अवघड जातं. राज्य सरकारकडून अशा ठिकाणी कोरोनाचे रुग्ण येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात होते. याचसाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र आता धारावीत कोरोनाबाधिक रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा रुग्ण 56 वर्षांचा असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा रुग्ण धारावीतील शाहू नगर येथे आढळून आला. त्याच्याघरातील 8 ते 10 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. याशिवाय हा रुग्ण राहत असलेल्या इमारतीला सील करण्यात येत आहे. संबंधित - VIDEO : मोदींबाबत खोटं बोलल्याने पाकिस्तानी मीडियामध्ये इम्रान खान यांचीच फजिती

)







