मुंबई, 01 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे (Corornavirus) जगभरात काही ठिकाणी लॉकडाऊन तर काही ठिकाणी कर्फ्यूचं वातावरण आहे. यूरोपमधील मोठमोठ्या देशांपासून अगदी भारताने सुद्धा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन असून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं आहे. मात्र अद्यापही भारताचा शेजारी देश पाकिस्तान लॉकडाऊन करण्यासाठी कचरत आहे. एवढंच नव्हे तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) भारताच्या पंतप्रधानांबद्दल चुकीची वक्तव्य करत आहेत. मोदींनी घाईघाईत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आता माफी मागितली आहे, असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं आहे.
(हे वाचा-या देशाचा अजब निर्णय, ‘कोरोनाव्हायरस’चं नाव घेतलं आणि मास्क घातला तर होणार अटक)
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावरून पाकिस्तानी मीडियाने इम्रान खान यांच्या खोट्या वक्तव्याची पोलखोल केली आहे. इम्रान खान यांनी खोटारडे वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण पाकिस्तानी मीडियानेच दिले आहे.
Fact check on Imran Khan's fake claims re Indian PM Modi's statement on lockdown: pic.twitter.com/GDBP2zVDQN
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) March 30, 2020
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या आधीच्या काही वक्तव्यांवर देखील मीडियाने ताशेरे ओढले आहेत.
In the last media interaction PM Khan lied about shortage of petrol in Gilgit-Baltistan and Karachi port closing due to lockdown, both his claims were busted by Shahzeb Khanzada. And now this: pic.twitter.com/56ByZDtI4G
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) March 30, 2020
दरम्यान ट्वीटरवर इम्नान खान यांच्या वक्तव्याबाबत जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात देखील कोरोनाची भीती वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकारने योग्य पावलं उचलावी असा सल्ला सोशल मीडियावर देण्यात येत आहे.