जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / COVID 19 रुग्णांसाठी 1000 बेडच्या हॉस्पिटलची उभारणी पाहून व्हाल थक्क, आदित्य ठाकरेंनी शेअर केला VIDEO

COVID 19 रुग्णांसाठी 1000 बेडच्या हॉस्पिटलची उभारणी पाहून व्हाल थक्क, आदित्य ठाकरेंनी शेअर केला VIDEO

COVID 19 रुग्णांसाठी 1000 बेडच्या हॉस्पिटलची उभारणी पाहून व्हाल थक्क, आदित्य ठाकरेंनी शेअर केला VIDEO

या ठिकाणी कोव्हिड रूग्णांसाठी 900 अलगीकरण, 100 आयसीयू आणि 50 डायलिसिस बेड्स असणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 1 जून: मुंबई आणि परिसरात कोरनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने महापालिका आणि प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केलीय. रुग्णांची वाढती गरज लक्षात घेऊन मुंबईतल्यी बीकेसी मैदानावर 1000 बेडच्या हॉस्पिटलची उभारणी अतिशय वेगात सुरू आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स आणि तंत्रज्ञांच्या मदतीने हे तात्पुरतं हॉस्पिटल उभारलं जात आहे. याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली असून त्याचा खास व्हिडीओ पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शेअर केलाय. त्यावरून त्या कामाचा झपाटा लक्षात येतो. MMRDA हे हॉस्पिटल उभारत आहेत. ज्युपिटर हॉस्पिटल त्यासाठी मदत करत आहे. या ठिकाणी कोव्हिड रूग्णांसाठी 900 अलगीकरण, 100 आयसीयू आणि 50 डायलिसिस बेड्स असणार आहेत. हे हॉस्पिटल उभारण्यासाठी शेकडो कामगार, तंत्रज्ञ, डॉक्टर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. ज्या वेगाने आणि जिद्दीने हे हॉस्पिटल उभारण्यात येत आहे त्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी MMRDA आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. अशाप्रकारचा प्रयोग देशात पहिल्यांदाच केला जात असून त्यामुळे राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेच्या सुधारणांसाठी मोठा फायदा होणार आहे. दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज बंगळुरू येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोरोना संकटावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, दुसर्‍या महायुद्धानंतरचे जगावरील हे सर्वात मोठे संकट आहे. महायुद्धानंतर जसे जग होते, तसेच कोरोनानंतर जग पूर्णपणे बदलेल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना वर्दी नसलेले सैनिक असे संबोधित केले. कोरोनाविरूद्धच्या युद्धात भारत नक्कीच जिंकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

जाहिरात

पंतप्रधानांनी यावेळी, म्हणाले की कोव्हिड -19 व्हायरस हा अदृश्य शत्रू आहे, पण मला विश्वास आहे की आपले वैद्यकीय कर्मचारी त्याचा पराभव करतील, असे म्हणत वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. हे वाचा - सरकारच्या उलट आहे शास्त्रज्ञांचा दावा, कोरोनाचं होतंय कम्युनिटी ट्रान्समिशन चीन नव्हे तर ‘या’ देशात जगातील कोरोनाचा पहिला रुग्ण; डॉक्टरांचा दावा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात