चीन नव्हे तर 'या' देशात जगातील कोरोनाचा पहिला रुग्ण; पुराव्यानुसार डॉक्टरांचा दावा

चीन नव्हे तर 'या' देशात जगातील कोरोनाचा पहिला रुग्ण; पुराव्यानुसार डॉक्टरांचा दावा

नोव्हेंबरमध्येच कोरोनाव्हायरसचा (coronavirus) पहिलं प्रकरण होतं, असा दावा या डॉक्टरांनी केला आहे.

  • Share this:

पॅरिस, 01 जून : डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला, त्यानंतर हा व्हायरस जगभर पसरला. त्यामुळे चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण असावा असं आतापर्यंत म्हटलं जातं. मात्र कोरोनाचा पहिला रुग्ण हा चीन नव्हे तर फ्रान्समध्ये (France) होता, असा दावा फ्रान्सच्या डॉक्टरांनी केला आहे.

उत्तर-पूर्व फ्रान्सच्या कॉलमारमधील अल्बर्ट श्वित्जर हॉस्पिटलमधील डॉ. माइकल श्मिट यांच्या टीमने दावा केला आहे की, चीनमध्ये कोरोनाव्हायरसचं पहिलं प्रकरण समोर आलंच नसावं कारण नोव्हेंबरमध्ये युरोपमध्ये या संक्रमणाने पाय रोवले होते.

डेली मेलमधील रिपोर्टनुसार डॉक्टरांनी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये रुग्णालयात फ्लूची समस्या घेऊन आलेल्या 2500 पेक्षा जास्त रुग्णांच्या एक्स-रे रिपोर्टचा अभ्यास केला. नोव्हेंबरमध्येच 2 एक्स-रे रिपोर्ट असे आहेत, ज्यामध्ये कोरोनाव्हायरसची पुष्टी झाली. 16 नोव्हेंबरला एका व्यक्तीचा एक्स-रे काढण्यात आला होता. ज्याचा रिपोर्ट पाहिल्यानंतर त्याला कोरोना संक्रमण होतं हे स्पष्ट होतं. याच व्यक्तीचा दुसऱ्या दिवशीही एक्स-रे काढण्यात आला, त्यात संक्रमणाची लक्षणं दिसून आली. मात्र त्यावेळी डॉक्टरांना याबाबत माहिती नव्हती.

हे वाचा - COVID-19 : तीन भारतीय कंपन्यांना मिळाला NASA चे व्हेंटिलेटर बनवण्याचा परवाना

फ्रान्समध्ये 24 जानेवारी, 2020 ला कोरोनाव्हायरसचं पहिलं प्रकरण सापडलं होतं. मात्र या टीमच्या दाव्यानुसार 16 नोव्हेंबर, 2019 ला पहिलं प्रकरण समोर आले. डिसेंबरमध्ये काढण्यात आलेल्या एक्स-रे मध्ये एकूण 12 लोकं अशी होती, ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं स्पष्ट दिसत होती.

डॉ. माइकल श्मिट यांच्या मते, "फ्रान्सच नाही तर युरोपच्या बहुतेक देशांमध्ये आणि अमेरिकेत ज्या रुग्णांना पेशंट झिरो मानण्यात आलं ते पेशंट झिरो नव्हते आणि त्यामुळे प्रकरणं ट्रॅक झाली नाहीत आणि वाढत गेली"

युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधील ग्लोबल हेल्थ एक्सपर्ट आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. विन गुप्ता यांनीदेखील या दाव्याची आणि एक्स-रेची पडताळणी केली. डॉ. विन यांच्या मते, एक्स-रेमध्ये फुफ्फुसामध्ये जे बदल दिसून आलेत ते असामान्य आहेत. असे बदल कोरोना संक्रमणामुळे होतात.

हे वाचा - 'Coronavirus हा जेवढा मोठा केला गेला, तेवढा भयंकर नाही'

ही टीम आता ऑक्टोबरमधील एक्स-रेचीदेखील तपासणी करते आहे जेणेकरून खऱ्या पेशंट झिरोपर्यंत पोहोचता येईल.

फ्रान्सचेच डॉ. युव्स कोहेन यांनीही दावा केला होता की, पॅरिसच्या इले-दे-फ्रान्स रुग्णालयातबी 27 डिसेंबरला कोरोनाच्या पहिल्या संक्रमणाची पुष्टी झालेली आहे. डॉक्टर कोहेन यांच्या टीमने डिसेंबर आणि नोव्हेंबरमधील 24 रुग्णांच्या रिपोर्टची तपासणी केली ज्यात कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. हे कोरोना रुग्णच असल्याचं कोहेन यांच्या टीमने सांगितलं.

हे वाचा - गुलाबपाणी वापरण्याची योग्य पद्धत; त्वचेच्या सर्व समस्यांवर ठरेल उपयुक्त

चीनमध्ये  कोरोनाचा पहिला रुग्ण 17 नोव्हेंबरला सापडला होता. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार सरकारी दस्तावेजात त्या रुग्णाची नोंद आहे. चीनी प्रशासनाने अशा 266 संशयित कोरोना रुग्णांची माहिती मिळवली आहे, ज्यांना गेल्या वर्षी हा आजार झाला होता. डिसेंबरअखेर चीनच्या एका डॉक्टराने या नव्या आजाराबाबत सांगितलं. हुबेई प्रांतातील हॉस्पिटलमधील डॉ. झांग जिक्सियन यांनी चीनी प्रशासनाला नव्या प्रकारचा कोरोनाव्हायरस पसरत असल्याचं 27 डिसेंबरला सांगितलं. त्यावेळी जवळपास 180 कोरोना रुग्ण सापडले. 31 डिसेंबरला चीनने कोरोना संक्रमण पसरल्याची अधिकृत घोषणा केली होती.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: June 1, 2020, 2:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading