मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /ऐकावं ते नवलंच! प्लास्टिकच्या बाटल्यांपासून व्हॅनिला आइस्क्रीमचा फ्लेवर मिळणार, शास्त्रज्ञांना यश

ऐकावं ते नवलंच! प्लास्टिकच्या बाटल्यांपासून व्हॅनिला आइस्क्रीमचा फ्लेवर मिळणार, शास्त्रज्ञांना यश

प्लास्टिक कचऱ्याची (Plastic Waste) समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. प्लास्टिकच्या पुनर्वापराला (Plastic Recycle) पर्याय नाही, हे शास्त्रज्ञांनी वारंवार सांगितलं आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांपासून चक्क स्वादिष्ट व्हॅनिला आइस्क्रीम तयार करण्याचा मार्ग आता शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे.

पुढे वाचा ...

  मुंबई, 13 डिसेंबर : प्लास्टिक कचऱ्याची (Plastic Waste) समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. प्लास्टिकच्या पुनर्वापराला (Plastic Recycle) पर्याय नाही, हे शास्त्रज्ञांनी वारंवार सांगितलं आहे. म्हणूनच जगभरातले शास्त्रज्ञ प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी वेगवेगळे उपाय शोधून काढत असतात. वाया गेलेल्या प्लास्टिकपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू किंवा उपयोगी साहित्य बनवलं जातं. प्लास्टिकच्या बाटल्यांपासून चक्क स्वादिष्ट व्हॅनिला आइस्क्रीम तयार करण्याचा मार्ग आता शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे.

  Live Science च्या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, प्लास्टिकच्या वाया गेलेल्या बाटल्यांपासून व्हॅनिलिन (Vanillin) काढून त्यापासून व्हॅनिला फ्लेव्हर तयार करण्याची पद्धत शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. व्हॅनिला इसेन्समध्ये (Vanilla Essence) वापरला जाणारा फ्लेव्हर सध्या 85 टक्के व्हॅनिलिन या रसायनापासून आणि 15 टक्के व्हॅनिला बीन्सपासून (Vanilla Beans) काढला जातो. आता या पद्धतीत थोडा बदल करून शास्त्रज्ञांनी प्लास्टिकच्या बाटल्यांपासूनही व्हॅनिला इसेन्स तयार करण्याची पद्धत शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे.

  व्हॅनिला फ्लेव्हरचा उपयोग खाण्या-पिण्याच्या गोष्टींपासून कॉस्मेटिक, फार्मास्युटिकल, क्लीनिंग, हर्बिसाइड प्रॉडक्ट्स आदींमध्ये होतो. आता हा फ्लेव्हर शास्त्रज्ञ सिंथेटिक (Synthetic Flavour) स्वरूपातही तयार करू शकतील. प्लास्टिकपासून व्हॅनिलिन तयार करता येऊ शकतं, असं शास्त्रज्ञांना संशोधनात आढळलं आहे. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार आहे.

  ओमिक्रॉन व्हेरिएंट वर्षापूर्वीपासूनच अस्तित्वात? शास्त्रज्ञांच्या दाव्याने खळबळ

  प्लास्टिक बाटल्या तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टेरेफ्थॅलिक अॅसिडपासून जेनेटिक इंजिनीअरिंगच्या साह्याने व्हॅनिलिन तयार करण्यात युनिव्हर्सिटी ऑफ एडिंबरामधल्या दोन शास्त्रज्ञांनी यश मिळवलं आहे. या दोन्हींमध्ये एकच रासायनिक तत्त्व असतं. गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, त्यात थोडा बदल करून एका दिवसासाठी जेव्हा ते 37 अंश तापमानावर ठेवलं गेलं, तेव्हा 79 टक्के टेरेफ्थॅलिक अॅसिड व्हॅनिलिनमध्ये रूपांतरित झालं.

  2018 साली जागतिक बाजारात व्हॅनिलिनची मागणी 40,800 टन एवढी होती. 2025 साली ती 65 हजार टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्लास्टिक वेस्टपासून व्हॅनिला इसेन्स तयार होऊ लागला, तर प्लास्टिकचा कचराही कमी होईल आणि व्हॅनिला इसेन्सची मागणीही पूर्ण होऊ शकेल.

  कोरोना पुन्हा मोठा संहार करणार! 4 महिन्यात ब्रिटनमध्ये 75000 मृत्यू होणार

  जगभरात प्रत्येक मिनिटाला प्लास्टिकच्या 10 लाख बाटल्या विकल्या जातात. त्यापैकी केवळ 14 टक्के बाटल्यांचाच पुनर्वापर होतोय. त्यामुळे या तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला, तर प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न काही अंशी तरी सुटण्यास मदत होऊ शकते, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो आहे.

  First published:
  top videos

   Tags: Plastic, Science, Scientist