मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला पृथ्वीराज चव्हाणांचा पाठिंबा?

नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला पृथ्वीराज चव्हाणांचा पाठिंबा?

Prithviraj Chavan on Nana Patole: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाना पटोले यांनी केलेल्या स्वबळाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Prithviraj Chavan on Nana Patole: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाना पटोले यांनी केलेल्या स्वबळाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Prithviraj Chavan on Nana Patole: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाना पटोले यांनी केलेल्या स्वबळाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 14 जुलै: काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. इतकेच नाही तर नाना पटोले हे वारंवार स्वबळावर निवडणूक (Individually contest election) लढण्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Dycm Ajit Pawar) टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही आपल्या खास शैलीत नाना पटोलेंवर भाष्य केलं. काँग्रेस पक्षाकडून इतर कुणीही नेते नाना पटोलेंच्या बाजून बोलताना दिसत नव्हतं. पण आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्यावर भाष्य करत अप्रत्यक्षरित्या पाठिंबाच दिला आहे.

नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं, स्थानिक स्वराज संस्था स्थानिक पातळी आणि बहुतेक वेळा स्वबळ असतात, स्थानिक पातळीवर निर्णय होतो. मोठ्या निवडणुक लोकसभा विधानसभा स्वबळ यावर केंद्रीय नेतृत्व निर्णय घेते. पक्ष मजबूत होण्यासाठी पटोले भूमिका घेतात. पक्ष वाढविण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा, त्यात चुकीच नाही असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी अप्रत्यक्षरित्या नाना पटोलेंच्या नाऱ्याला समर्थन दिलं आहे.

2024 च्या निवडणुकीत 400 जागा जिंकणार, भाजपने केला मोठा दावा

सामनातून नाना पटोलेंना चिमटा

नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला त्यानंतर शरद पवारांनी त्यांना आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. आता या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोन दिवस राजकारणात गरमी आली पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली का? असा थेट सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. नाना पटोले यांच्या बोलण्यामुळे महाविकास आघाडीत फूट असल्याचे चित्र विरोधकांनी निर्माण केले पण नानांच्या भाषणाचा खरा रोख भाजपवरच होता असंही सामनात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी शरद पवार हेच योग्य उमेदवार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मन की बातमुळे खळबळ

नाना पटोले यांनी आपली मन की बात सांगितली. त्या मन की बातमुळे थोडी खळबळ माजली. ठीक आहे, होऊ द्या खळबळ. पटोले हे मोकळ्या स्वभावाचे आहेत. जसे भाजपत रावसाहेब दानवे आहेत तसेच काँग्रेसमध्ये नाना पटोले आहेत. नाना पटोले हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून सतत चर्चेत आहेत.

शरद पवारांकडून पटोलेंना उत्तर

लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरात नानांनी ताव मारला की, आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. मला सुखाने जगू दिले जाणार नाही. नाना पटोले पुढे म्हणाले, काँग्रेसचा स्वबळाचा नारा कायम आहे. नानांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला बळ मिळाले असेल तर चांगले आहे. स्वबळाचा नारा याआधीही त्यांनी दिला आहे आणि त्यात काही चुकीचे नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपल्या शैलीनुसार 'स्वबळा'च्या नाऱ्याला उत्तरे दिलीच आहेत असंही सामानाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

First published:

Tags: Congress, Nana Patole, Prithviraj Chavan