जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ, प्रचंड गोंधळाची स्थिती, पक्षाला मजबूत करण्यासाठी सोनियांचं कारवाईचं हत्यार

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ, प्रचंड गोंधळाची स्थिती, पक्षाला मजबूत करण्यासाठी सोनियांचं कारवाईचं हत्यार

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ, प्रचंड गोंधळाची स्थिती, पक्षाला मजबूत करण्यासाठी सोनियांचं कारवाईचं हत्यार

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांची महाराष्ट्रात विशेष चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी मोहन प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

विनोद राठोड, प्रतिनिधी नवी दिल्ली, 10 जुलै : महाराष्ट्रातील काँग्रेस (Maharashtra Congress) नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या या आता नव्या राहिलेल्या नाहीत. महाराष्ट्रातील काही दिगग्ज काँग्रेसच्या नेत्यांमधील मतभेदाने टोक गाठल्याच्या अनेकवेळा चर्चा रंगतात. पण या मतभेदांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत (MLC election) काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakanat Handore) यांचा पराभव झाल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे ही झळ ताजी असताना काँग्रेसचे काही नेते नव्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळीदेखील अधिवेशनात उपस्थित राहू शकले नाहीत. या घटनांमुळे काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ सुरु आहे. काँग्रेस नेते पक्षाला बळकट करण्यासाठी मेहनत घेत नाहीत की त्यांना जबाबदारीचं भान राहिलेलं नाही? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही गोंधळाचं वातावरण आहे. या सर्व गोंधळाच्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी आणि काँग्रेस नेत्यांवर वचक ठेवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress Chief Sonia Gandhi) यांनी कारवाईचं हत्यार उपसल्याची चर्चा आहे. त्यासाठी सोनिया यांनी एका ज्येष्ठ नेत्याला कामाला लावलं आहे. पक्षातील काही नेत्यांकडून जर खरंच शिस्तभंग होत असेल तर आता त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे. आणि हाच सोनिया गांधींचा पक्षाला बळकट करण्यासाठीचा मास्टरप्लॅन असल्याचं मानलं जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची तब्बल 11 मते फुटल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना या संपूर्ण प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांची महाराष्ट्रात विशेष चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी मोहन प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातून काँग्रेसच्या तब्बल 11 आमदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी काँग्रेसचे तब्बल 11 आमदार अनुपस्थित होते. यापैकी 9 आमदारांनादेखील सोनिया गांधींनी या प्रकरणी 11 नोटीस दिल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. या सगळ्या प्रकरणाची माहिती घेऊन मोहन प्रकाश उद्या दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ( बंडाच्या निर्णयाला आधार नाही! शरद पवार यांचं बंडखोरांना आव्हान, म्हणाले जमतेसमोर येऊन.. ) मोहन प्रकाश आज रात्री विमानाने दिल्लीला जातील. त्यानंतर उद्या सकाळी ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा करतील. त्यानंतर ते पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्रात येतील. महाराष्ट्रात ते दोन दिवस राज्य काँग्रेसमधील विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कसून चौकशी करतील. ज्या आमदारांना नोटीस पाठवली आहे त्यांची बाजू ऐकून घेतील. त्यानंतर या सर्व प्रकरणाचा एक अहवाल तयार करतील आणि पुन्हा दिल्लीला जातील. दिल्लीत ते सोनिया गांधी यांच्यासमोर अहवाल सादर करतील. त्यानंतर आमदारांची चुकी आढळल्यास पक्षाध्यक्षा सोनिया गांधी योग्य तो निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नेमकं प्रकरण काय? एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसच्या अनेक आमदारांच्या अनुपस्थितीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केलेली. तसेच त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईची मागणी केली होती. गेल्या महिन्यात 20 जूनला विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत काँग्रेसच्या दोन उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांचा विजय झाला. तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांची मते फुटल्याची बातमी समोर आली होती. या घटनेप्रकरणी देखील पक्षात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे ही कारवाई मागणी केली होती. एका दलित उमेदरावाचा पराभव ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. या प्रकरणी चौकशी व्हायला हवी. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनेक आमदारांची सभागृहात अनुपस्थिती हे देखील योग्य नाही, असंदेखील पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले होते. विश्वासदर्शक ठरावावेळी अनुपस्थित राहिलेल्या काँग्रेस हायकमांडची ‘या’ आमदारांना नोटीस अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री झिशान सिद्दिकी, आमदार वांद्रे पूर्व धीरज देशमुख, लातूर ग्रामीण कुणाल पाटील, धुळे ग्रामीण राजू आवळे, हातकणंगले मोहन हंबर्डे, नांदेड दक्षिण शिरीष चौधरी, रावेर माधवराव पाटील जवळगावकर, हदगाव-हिमायतनगर …तर काँग्रेसचे दहा आमदारांचा गट फुटणार होता? विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसच्या देखील दहा आमदारांचा गट महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीचं प्रकरण लवकर निवळलं असतं तर काँग्रेसमधीलही धुसफूस उफाळून आली असती अशा चर्चा रंगल्या होत्या. पण काँग्रेसकडून या बातम्यांचं खंडन करण्यात आलं होतं. ही सगळी खोटी माहिती असल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात