जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद, नाना पटोलेंच्या 'त्या' निर्णयावर बड्या नेत्याची नाराजी

काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद, नाना पटोलेंच्या 'त्या' निर्णयावर बड्या नेत्याची नाराजी

काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद, नाना पटोलेंच्या 'त्या' निर्णयावर बड्या नेत्याची नाराजी

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या दरम्यान काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 जून : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) सध्या अडचणीत सापडलं आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सगळ्या घाडमोडी घडत असताना काँग्रेसमधील (Congress) मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेदाच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. त्याचबरोबर काँग्रेसमधील देखील अंतर्गत वाद याआधी चव्हाट्यावर आले होते. आता पुन्हा एकदा काँग्रेसमधील मतभेद समोर येताना दिसत आहेत. काँग्रेसमधील एक बडे नेते हे त्यांच्याच प्रदेशाध्यक्षांच्या आणि पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर नाराज असल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. राज्यात सध्या राजकीय पेच निर्माण झाला असताना विधानसभा अध्यक्ष पदाला महत्त्व निर्माण झालंय. कॉंग्रेसने राजीनामा देऊन फार मोठी चूक केली हे तर मान्यच आहे. आणि आताही काँग्रेसला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झालं असतं. पण काँग्रेसची एक चूक आणि गेली 2 वर्षे अध्यक्षांविना कामकाज सुरू आहे, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत. तसेच यासंदर्भात आणि विरोधकांनी सरकारच्या खर्चाला मान्यता देण्यावर बंधन यावी या विरोधकांच्या मागणीवर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ( शिंदे गटाच्या नव्या दाव्याने आघाडीला मोठा धक्का? उपाध्यक्ष झिरवळ यांच्यावरच होणार कारवाई? ) विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. सरकार स्थापन झाल्यानंतर सध्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. पण त्यानंतर अवघ्या वर्षभरात काँग्रेसने नाना पटोले यांना अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर नाना पटोले यांच्यावर काँग्रसेच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पण काँग्रेसचा तोच निर्णय चुकला, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. “विधानसभा अध्यक्षांना महत्त्व असतं. सध्याच्या घडामोडी पाहता हे खरं आहे की, आता काँग्रेसला महत्व आलं असतं. पण आमची मतं उघड बोलता येत नाही. आमच्या लोकांनी फार घाई केली हे मान्य आहे”, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. या दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सध्याच्या विकासकामांवर प्रतिक्रिया दिली. “राज्य सरकारकडून आज कामं कोणती होत आहेत हे पण बारकाईने बघणं गरजेचं आहे. जनजीवन मिशनचे सुमारे 7000 कोटी सध्या राज्य सरकरकडे आहेत. जलसंधारणाची काम सुरु आहेत. ही झालीच पाहिजे. विकासाची कामे चुकीचे आहेत म्हणून विकासाला खीळ का घालायची? असे प्रसंग अनेक आले आहेत, पण सरकारने काम थांबवलं नाही”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात