Home /News /mumbai /

पक्ष वाचवण्यासाठी आघाडी सरकार फुटणार? राऊतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नाराज, बोलावली तातडीची बैठक

पक्ष वाचवण्यासाठी आघाडी सरकार फुटणार? राऊतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नाराज, बोलावली तातडीची बैठक

काँग्रेसने यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.

    मुंबई, 23 जून : महाराष्ट्रातील राजकीय भूकंप अद्यापही क्षमण्याचं नाव घेत नाही. आतापर्यंत उद्धव ठाकरेंकडे (Chief Minister Uddhav Thackeray) असलेल्या अनेक आमदारांनी गुवाहाटीचा रस्ता धरला आहे. अनेक आमदार नॉटरिचेबल होत आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबरच आघाडी सरकारसाठीही धोक्याची चिन्ह आहे. पक्ष वाचवायचा की, सत्ता अशा दुहेरी कोंडीत उद्धव ठाकरे अडकले आहेत. एकनाथ शिंदेकडून वारंवार भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी याला कधीच समर्थन दिलं नाही. दरम्यान ठाकरेंचे निकटवर्तीय संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी आता बंडखोर आमदारांना 24 तासात परत येण्याचं आवाहन केलं आहे. तुम्ही परत या. सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार होईल. तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. तुमच्या भूमिकेवर विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांच्या या वक्त्यामुळे (sanjay raut statement) आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. यानंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली, अशी माहिती सूत्रांकडून आली आहे. यासंदर्भात तातडीची बैठकही बोलावण्यात आली आहे. संजय राऊतांचं हे वक्तव्य ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर ठरवण्यात आलं का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. एकंदरच संजय राऊतांचं वक्तव्य (congress angry on sanjay raut statement) काँग्रेसच्या जिव्हारी लागलं आहे. काय म्हणाले संजय राऊत? भाजपच्या ताब्यातीला 21 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला असल्याचं राऊत म्हणाले आहेत. ज्यादिवशी मुंबईला येतील तेव्हा 21 आमदार शिवसेनेसोबत असतील. सर्वांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. तर भाजपने नेलेल्या आमदारांपैकी 2 आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील परत आले आहेत, असं ते म्हणाले. इथे सर्व मिळून भाजपने अपहरण केलेले 23 आमदार मुंबईत येताच आपल्यासोबत येणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीचा विजय होईल इतका आकडा आमच्याकडे आहे, असा दावा ऱाऊतांनी केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Sanjay Raut (Politician), Sharad Pawar (Politician), Udhhav Thakeray

    पुढील बातम्या