Home /News /mumbai /

CAAवरून काँग्रेसने साधला CM उद्धव ठाकरेंवर निशाणा

CAAवरून काँग्रेसने साधला CM उद्धव ठाकरेंवर निशाणा

'उद्धव ठाकरे यांना CAAविषयी योग्य माहिती देण्याची गरज आहे. आता जे NPR राबवलं जातेय ते NRCची पहिली पायरी आहे.'

    मुंबई 22 फेब्रुवारी : CAA आणि NPR वरून काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA आणि NPR बद्दल गैरसमज पसरविला जातोय असं म्हटलंय. यात घाबरण्यासारखं काहीही नाही असंही ते म्हणाले. आसामा नंतर इतर कुठल्याही राज्यांमध्ये NRC राबविली जाणार नाही असं पंतप्रधानांनी सांगितल्याची माहितीही त्यांनी दिली. उद्धव ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंना हा विषय समजावून सांगावा लागेल. हे एवढं साधं सोपं नाही असंही ते म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी ट्वीट करून सांगितलं की उद्धव ठाकरे यांना CAAविषयी योग्य माहिती देण्याची गरज आहे. आता जे NPR राबवलं जातेय ते NRCची पहिली पायरी आहे असंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे या प्रश्नावर आता शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने येण्याची शक्यता आहे. तर CAAची सगळी माहिती घेतलीय. त्यात वावगं काहीही नाही. त्यामुळे कुठल्याही भारतीय नागरीकाचं नागरीकत्व जाणार नाही असंही ते म्हणाले होते. त्यामुळे काँग्रेसची आक्रमक भूमिका ही शिवसेनेला अडचणीत आणणारी आहे. शरद पवारांनी केलं CM उद्धव ठाकरेंचं तोंड भरून कौतुक, म्हणाले... काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? 'कुणाचेही अधिकार हिरावून देणार नाही' मोदी यांच्यासोबत CAA कायदा आणि NRC, NPR बद्दल चर्चा झाली. CAA बद्दल घाबरण्याचे कारण नाही. देशात कुणालाही काढण्यासाठी कायदा होऊ नये. याआधीच आपण भूमिका मांडली आहे. तीच भूमिका कायम आहे. जर यात काही चुकीचं असेल तर त्यावरून वाद होईलच. परंतु, केंद्राने आधीच स्पष्ट केलं आहे की देशात  NPR लागू होणार नाही. वयाच्या 80 नंतर आता रोल बदललाय, शरद पवारांनी दिले नव्या भूमिकेचे संकेत 'जीएसटीतून पैसा येत नाही' जीएसटीबद्दलही पंतप्रधान मोदी यांना सांगितलं आहे. जीएसटीतून पैसा मिळत नाही. शेतकरीही अडचणीत आहे. पंतप्रधान विमा योजनेचा पैसाही शेतकऱ्यांना मिळत नाही. 'राज्यपाल आणि सरकारमध्ये वाद नाही' राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये कोणताही वाद नाही. कोणतीही ठिणगी पेटलेली नाही. अधिवेशन तोंडावर आले आहे, त्यामुळे त्यांच्या काही सुचना असतील त्या स्वीकारल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Uddhav thackeray

    पुढील बातम्या