मुंबई, 10 मार्च : राज्यात कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढत असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाउन (LockDown) लागू करण्यात आला आहे. पण, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणखी वाढत राहिली तर जिथे गरजेचा वाटेल त्या ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhv Thackery) यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये जाऊन कोरोनाची लस घेतली. लस घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना महाराष्ट्रातील जनतेनंही कोरोनाची लस घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
कोरोनाचा धोका वाढत आहे, त्यामुळे ज्यांना ज्यांना कोरोनाची लस घेण्यासाठी पात्र ठरवले आहे, त्यांनी कोणतीही भीती न बाळगता लस घ्यावी. लस नोंदणीसाठी मध्ये गोंधळ निर्माण झाला होता पण आता अडचण दूर करण्यात आली आहे, लस सर्वांनी घ्यावी, असं मुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेस नगरसेवकाच्या घरातून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त, तस्करीचा आरोप
'कदाचित काही ठिकाणी लॉकडाउन लागू करावा लागणार आहे. म्हणून माझी सर्व लोकांना विनंती आहे की, लसीकरण करून घ्या, अनावश्यक गर्दी करू नका, मास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करा, जर कुठे नियमांचे पालन केले जात नसेल तर काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन लावावा लागणार आहे, एक दोन दिवसांमध्ये बैठक घेणार आहोत, त्यानंतर लॉकडाउनचा कडक निर्णय घ्यावा लागणार आहे', असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
मुस्लिम धर्म स्वीकारताच बॅटिंग सुधारली', दिग्गज क्रिकेटपटूचा वादग्रस्त दावा
मुंबईतल्या जे जे हाॅस्पिटलमध्ये ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोव्हॅक्सिन लस घेण्यात आली आह. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री अशा तीन जणांना लस देण्यात आली आहे. याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कुटुंबासह कोविडशिल्ड लस घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: उद्धव ठाकरे