मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

काँग्रेस नगरसेवकाच्या घरातून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त, तस्करी करत असल्याचा आरोप

काँग्रेस नगरसेवकाच्या घरातून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त, तस्करी करत असल्याचा आरोप

काँग्रेस नगरसेवक महेश भर्रे यांच्या घरातून 100 पेटी दारू जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये खळबळ माजली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 11 मार्च: काँग्रेस नगरसेवक (Congress Corporator) महेश भर्रे यांच्या घरातून 100 पेटी दारू जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये खळबळ माजली आहे. ब्रम्हपुरी शहरातील पेठ वार्ड परिसरात असलेल्या त्यांच्या घरात बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. मोठ्या प्रमाणात याठिकाणी दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. मुंबईमधून आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.

कारवाई करण्यात आलेले काँग्रेसचे नगरसेवक गेल्या अनेक महिन्यांपासून दारू तस्करीत सामील असल्याची चर्चा होती. पण राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने ही कारवाई केल्यानंतर सत्य बाहेर आलं आहे. महेश भर्रे आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात बेकायदेशीर दारुसाठा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक घरी उपस्थित नसल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नाही आहे.

बातमी अपडेट होत आहे

First published:

Tags: Illegal liquor, Liquor stock