जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / उद्धव ठाकरे लॉकडाऊनबद्दल घोषणा करणार? आज 5 वाजता साधणार संवाद

उद्धव ठाकरे लॉकडाऊनबद्दल घोषणा करणार? आज 5 वाजता साधणार संवाद

उद्धव ठाकरे लॉकडाऊनबद्दल घोषणा करणार? आज 5 वाजता साधणार संवाद

अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 11 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज 5 वाजता पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत. लॉकडाऊनबद्दल ते काही घोषणा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये त्यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढला अशी मागणी केली होती. तशीच मागणी अनेक मुख्यमंत्र्यांनीही केली. त्यानंतर काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यांमध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहिल अशी घोषणाही केली होती. त्यामुळे ते काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लॉकडाऊन पुढे 30 एप्रिलपर्यंत वाढवावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने लॉकडाऊन उठवण्याची चिंता व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसमवेत चिंता व्यक्त केली. यावर आवर घालण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत वाढावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरसचा देशात वेगानं वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी आज पुन्हा मोठी घोषणा कऱण्याची शक्यता आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले होते. मात्र राज्यातील स्थितीवरही प्रत्येक राज्य पंतप्रधानांसोबत चर्चा करून निर्णय घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण लॉकडाऊन वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तयार असल्याचं सांगण्यात येत आहेत.

कीर्तनात गर्दी खेचणारे इंदुरीकर महाराज लाकडाऊनच्या काळात करतात काय? पाहा VIDEO

ओडिसा आणि त्यापाठोपाठ पंजाबनेही 1 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनसंदर्भात बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत सकाळी 11 वाजल्यापासून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा सुरू आहे. हेही वाचा मोठी बातमीः CBSE बोर्डाचा 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा पॅटर्न बदलणार मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा जागीच मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात