मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Maharashtra lockdown: लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला; पण काही नियमांत शिथिलता येणार

Maharashtra lockdown: लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला; पण काही नियमांत शिथिलता येणार

Maharashtra Lockdown relaxations: 

Maharashtra Lockdown relaxations: 

Maharashtra Lockdown relaxations: 

मुंबई, 30 मे: राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus second wave) संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) ब्रेक द चेन (Break The Chain) अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले. या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम राज्यात दिसून आला आणि वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला तसेच रिकव्हरी रेटही वाढू लागला. जवळपास दोन महिन्यांपासून लागू असलेल्या या लॉकडाऊननंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण झाली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यांत अद्यापही रुग्णसंख्या कायम असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्येत घट झाली आहे तेथील नियमांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

15 दिवसांनी लॉकडाऊन वाढवला 

राज्यात अद्यापही काही भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन 15 दिवसांनी म्हणजेच 15 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर ज्या जिल्ह्यांत कोरोना रुग्ण संख्येत घसरण होत आहे तेथील निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून  त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. 29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.

कोरोनामुक्त गावाचा संकल्प

हिवरे बाजार सारखा प्रयत्न राज्यातील काही सरपंच व गावे करीत आहेत. मी त्यांचेही कौतुक करतो. पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख, कोमल ताई यांच्यासारखे सरपंच एक उदाहरण घालून देत आहेत. मी त्यांच्याशी बोलतो आहे. आज कोविडला रोखण्यात जसे वैद्यकीय उपचारांचे महत्व आहे तसेच लोकांची जागृती आणि सहभागही फार महत्वाचा आहे.

सरकार एकट्यानेच हा लढा लढू शकत नाही. हिवरे बाजार सारखे शिस्तबद्ध रितीने रोगाचा मुकाबला केल्यास आपल्यालाही कोविडशून्य गाव करता येऊ शकेलं आणि म्हणूनच हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील गावांनी नियोजन करावे असे आवाहन मी करतो. राज्य शासन या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करेल.

राज्यात लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला; नवे नियम जाहीर, पाहा काय सुरू आणि काय बंद?

महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ज्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला

कोविड परिस्थितीत निश्चित असे वैद्यकीय उपचार नसल्याने तसेच विषाणूच्या सतत बदलत जाणाऱ्या अवतारांमुळे वैद्यकीय क्षेत्रासमोर आज आव्हान उभे राहिले आहे. लस आली असली तरी सर्व लोकसंख्येला दोन डोस देण्यापर्यंत कालावधी जाणार आहे. तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग होऊ शकतो ही भीती आहे. हे सर्व लक्षात घेऊन आम्ही सातत्याने सर्व डॉक्टर्सशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ज्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला. सर्व जिल्ह्यांत तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला.

लॉकडाऊन वाढवला; तर काही जिल्ह्यातील नियमात बदल, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवला

राज्यात 15 दिवसांनी लॉकडाऊन वाढवला

कोरोनाच्या लाटेत अनेक बालकं अनाथ झाली

सर्व जिल्हे कोरोनामुक्त झाली तर राज्य कोरोनामुक्त होणार

कोरोनामुक्त गाव राज्य सरकारची नवी मोहिम

कोरोनामुक्त गाव ही मोहीम आपल्याला आजपासून राबवायची आहे

जर हे सरपंच आपले गाव कोरोनामुक्त करु शकतात तर इतर का नाही

दक्षिण सोलापूर येथील सुद्धा कोमलताई यांनी आपलं गाव कोरोनामुक्त केलं आहे

हिवरे बाजार, घाटणे ही गावे कोरोनामुक्त झाली

हिवरे बाजार हे कोरोनामुक्त झालं आहे

घरे कोरोनामुक्त झाली तर गाव कोरोनामुक्त होणार

प्रत्येक नागरिकाने जर ठरवलं तर मी, माझं घर कोरोनामुक्त ठेवणार

शहरी भागांत कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आहे ग्रामीण भागात थोडा प्रादुर्भाव आहे

आपण सहकार्य केलं नसतं तर कोविडची दुसरी लाट थोपवता आली नसती, हा लढा अजूनही सुरू आहे

लॉकाडाऊन असला तरी अर्थचक्र सुरू राहिलं पाहिजे

शिक्षण सुरूच ठेवायचं आहे, ऑनलाईन ठेवायचं की आणखी काही करायचं

शिक्षण क्षेत्रात काही क्रांतिकारी निर्णय घेण्याची गरज

देशासाठी एक शैक्षणिक धोरण असायला हवं

बारावीच्या परीक्षेबाबत केंद्राने धोरण ठरवायला हवं

मी परीक्षेच्या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे

दहावीचा निर्णय आम्ही घेतला बारावीच्या परीक्षांसंदर्भात निर्णय घेणार आहोत

परीक्षांच्या संदर्भात संपूर्ण देशभात शैक्षणिक धोरण एक असावं

कोविड प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत

18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी महाराष्ट्राची

साधारणत: सव्वादोन कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे

येत्या काळात लसीकरणाचा वेग वाढवणार

वयोमानाप्रमाणे म्हटलं तर कदाचित तिसरी लाट बालकांत येऊ शकते

पहिली लाट वयोवृद्द, दुसरी लाट तरुणांत आली होती

कोविड विरुद्धचं युद्ध आपण नक्कीच जिंकू शकतो

कोविड- नॉन कोविड ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे

स्टेरॉईडमुळे म्युकरमायकोसिसचं प्रमाण वाढलं

पावसाळ्यात साथीचे रोग रोखण्याची गरज

पावसाळ्यात साधीचे आजार आहेतच आणि त्यात कोरोनाचं संकट आहे

राज्यात म्युकरमायकोसिसचे 3 हजार रुग्ण

उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद करावा लागला होता आणि नंतर तोही कमी पडला

राज्याची ऑक्सिजन निर्मिती क्षमता 1200 मेट्रिक टन इतकी

राज्याला दरदिवशी 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लागत होती

ऑक्सिजन आता अवघ्या काही तासांसाठी राहिला आहे असे फोन मधल्या काळात येत होते आणि यामुळे घाम फुटत होता, प्रशासनाचे धाबे दणाणत होते

दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे

तिसरी लाट संपूर्णपणे आपल्या वागण्यावर अवलंबून असेल

रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणे आवश्यक

रुग्णसंख्या वाढल्याने ऑक्सिजनची आवश्यकता सुद्धा वाढली

तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे

ग्रामीण भागात रुग्णसंख्या हलकीशी वाढताना दिसत आहे

राज्यातील काही जिल्हे असे आहेत तेथे रुग्ण संख्या हलकीशी वाढताना दिसत आहे आणि ती गोष्ट काळजीची आहे

कडक लॉकडाऊन नाही पण निर्बंध कायम राहणार

कडक लॉकडाऊन केलेला नाहीये, निर्बंध लागू आहेत

बाधितांची संख्या हळूहळू कमी होत आहे

यावेळी रिकव्हरी रेट हा खूपच दिलासादेणारा आहे

साधारणत: 17 सप्टेंबर 2020 रोजी 24 हजारांच्या आसपास रुग्ण होते तर 26 मे 2021 रोजी 24 हजारांच्या आसपास रुग्ण संख्या होती म्हणजेच गेल्या लाटेतील सर्वोच्च रुग्ण संख्ये पेक्षा आता कुठे रुग्णसंख्या कमी होत आहे

यावेळीचं संकट हे सणासुदीच्या आधी आलं आहे

आज राज्यात 18 हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद झाली

पण नाईलाजाने आपल्या जीवाच्या काळजीपोटी हे काम करावं लागतं

निर्बंध लादावे लागतात, त्याच्या सारखं वाईट काम कुठलं असेल असं मला वाटत नाही

फेरिवाल्यांसाठी सुद्धा 52 कोटींचा निधी आतापर्यंत दिला आहे

नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी 154 कोटी 95 लाखांचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला

कोरोनाच्या लढाईत आपण ज्या काही घोषणा केल्या त्यात अन्न पुरवठा वितरण, शिवभोजन थाळी मोफत दिलं

भूकंप रोधक घरांची निर्मिती करावी लागणार, अंडरग्राऊंड वीज कनेक्शन करावे लागणार

किनारपट्टीच्या भागात ठोस उपाययोजना कराव्या लागणार

लवकरच नुकसानग्रस्तांना मदत देण्यात येणार

वादळामुळे नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करण्यात आली आहे

तौैत्के चक्रीवादळाच्या दरम्यान प्रशासनाने चांगलं काम केलं

मी कोकणाचा धावता दौरा केला

वादळ्याच्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून होतो

अनेक ठिकाणी घरांचे नुकसान, वीज पुरवठा खंडित झाला होता

तौत्के चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं

कोरोनाच्या संकटात जिद्दीनं आणि निश्चयाने बंधने पाळली त्याबद्दल धन्यवाद

साधारणत: महिन्याभरातनंतर आपल्याशी संवाद साधत आहे

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनाला सुरूवात

" isDesktop="true" id="558214" >

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने 5 एप्रिल 2021 रोजी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले. त्यानंतर सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 1 मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्य सरकारने हे निर्बंध 15 मे 2021 पर्यंत आणि त्यानंतर पुन्हा 31 मे 2021 पर्यंत पुन्हा निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला.

First published:

Tags: Coronavirus, Uddhav thacakrey