• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • लॉकडाऊन वाढवला; तर काही जिल्ह्यातील नियमात बदल, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

लॉकडाऊन वाढवला; तर काही जिल्ह्यातील नियमात बदल, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

 वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या इमारतीचा ऑनलाइन ई-भूमीपूजन सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला

वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या इमारतीचा ऑनलाइन ई-भूमीपूजन सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला

'कोरोनाची लाट ही सरकारी योजना नाही की ज्यात तुम्ही रस्त्यावर उतराल', मुख्यमंत्र्यांचं आवाहन

 • Share this:
  मुंबई, 30 मे : गेल्या अनेक दिवसात राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे 1 जूनपासून लॉकडाऊन हटविण्यात येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. (Uddhav Thackeray live) आज मुख्यमंत्र्यांनी पुढील 15 दिवस लॉकडाऊन वाढवला असल्याची घोषणा केली. दुसरी लाट अपेक्षेपेक्षा खूप मोठी होती. दरम्यान अद्यापही रुग्णसंख्ये पहिल्या लाटेच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन अधिक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. (Lockdown extended by 15 days)  तर काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात येणार असून तर जेथे रुग्णसंख्या कमी तेथे नियम शिथिल करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अत्यावश्यक सेवेतील दुकानं आता सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली राहणार आहेत. दुसरीकडे राज्यातील जिल्हाबंदीदेखील कायम ठेवण्यात आली आहे. हे ही वाचा-3 महिन्यात पहिल्यांदाच पुण्याचा चांगला रेकॉर्ड; कोरोनामुक्त दिशेने वाटचाल मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे -राज्यात दरवर्षी चक्रीवादळाचा धोका, कोरोनाचं संकट त्यात चक्रीवादळ -55 लाख शिवभोजन थाळ्या मोफत दिल्या आहेत. -लाट खाली येत असल्यामुळे निर्बंध उठवणार का? असा सवाल केला जात आहे -गेल्या लाटेत सर्वोच्च संख्येच्या बरोबरीने आजची आकडेवारी आहे, त्यामुळे भीती अजून टळलेली नाही. -17 ते 21 सप्टेंबर 24 हजार रुग्ण तर 26 मे रोजी 24,752 रुग्ण सापडले आहेत. - राज्यात काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. -ऑक्सिजन काही तासांसाठी शिल्लक, हे वाक्य ऐकून आजही घाबरायला होतं. -तिसरी लाट येणार, पण कधी येणार याबाबत माहीत नाही. -काळी जादु माहीत होती, आता काळ्या बुरशीचं संकट राज्यावर आहे. -माझा डॉक्टर संकल्पनेचं आयोजन करण्यात आलं आहे. -म्युकरमायकोसिसचे राज्यात तीन हजार रुग्ण
  Published by:Meenal Gangurde
  First published: