मुंबई, 30 एप्रिल: महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राज्यातील जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून संबोधित करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिसरी लाट (Coronavirus third wave) येणार असा तज्ज्ञांचा अंदाज आहे, तिसरी लाट आली तरी अर्थचक्र थांबता कामा नये. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सरकारची तयारी आहे. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच राज्यात आणखी कठोर निर्बंध (strict restrictions) लागू करणार का? यावरही भाष्य केलं आहे. काही दिवसांत 275 ऑक्सिजन प्लान्ट कार्यान्वित होणार ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतात. काही दिवसांत जिल्ह्यांत प्लान्ट तयार होतील त्यानंतर ऑक्सिजन तुटवडा कमी होईल. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी तयारी सुरू आहे. काही दिवसांत 275 ऑक्सिजन प्लान्ट कार्यान्वित होतील. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सरकारची तयारी आहे. 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांना लस मिळणार 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण राज्य सरकार करणार आहे. या वयोगटातील सुमारे 6 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकारची पूर्ण तयारी आहे. सर्व नागरिकांचे लसीकरण होणार असून कुणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे महाराष्ट्र लवकरच कोरोनावर मात करेल राज्यांसाठी वेगळं लसीकरण App तयार करण्याची केंद्राकडे मागणी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका, 18 ते 44 वयोगटातील प्रत्येक नागरिकाला लस मिळणार उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण जून-जुलैपर्यंत लसींचा पुरवठा सुरळीत होईल जस जसा लसींचा साठा उपलब्ध होईल तसे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होईल मे महिन्यात महाराष्ट्राला 18 लाख डोस मिळणार 6 कोटी नागरिकांना 12 कोटी लसींचे डोस द्यावे लागणार महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील 6 कोटी नागरिक आहेत राज्यात आत्तापर्यंत 1 कोटी 58 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण 7 कोटी लाभार्थ्यांना मोफत गहू आणि तांदुळ वाटप घोषणा केल्यापासून 15 लाखांहून अधिक नागरिकांना शिवभोजन थाळीचा लाभ 3 कोटी 94 लाख नागरिकांना शिवभोजन थाळीचा लाभ पुढील 2 महिने शिवभोजन थाळी मोफत गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणेने एक क्षणाचीही उसंत घेतली नाही नाशिक, विरार सारख्या घटना दुर्दैवी हॉस्पिटलमध्येच ऑक्सिजन प्लान्टची निर्मिती करणार काही दिवसांत 275 ऑक्सिजन प्लान्ट कार्यान्वित होतील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी तयारी सुरू आहे काही दिवसांत जिल्ह्यांत प्लान्ट तयार होतील त्यानंतर ऑक्सिजन तुटवडा कमी होईल आवश्यकता नसताना रेमडेसिवीरचा वापर करू नये, माझी सर्वांना नम्र विनंती रुग्णवाढ अधिक झाली तर मोठी अडचण होऊ शकते केंद्राकडून दररोज 35 हजार रेमडेसिवीरचा पुरवठा राज्याला दररोज 50 हजार रेमडेसिवीरची आवश्यकता सध्या राज्यात 5500 कोविड सेंटर्स कार्यरत आहेत राज्यात आतापर्यंत 609 प्रयोगशाळा रोजी मंदावेल पण रोटी थांबवू देणार नाही निर्बंध लागू केल्यानंतर कोरोना बाधितांची संख्या कमी झाली महाराष्ट्राची जनता संयम पाळतेय आणखी कठोर निर्बंध लावण्याची वेळ येणार का? तर मला गरज वाटत नाहीये हे दिवस सुद्धा जातील लॉकडाऊनसदृष्य नियम घालून काही दिवस झाले आहेत शेतकरी, कामगाराचं स्मरण, त्यांना मानाचा मुजरा मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना नम्र अभिवादन
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थिती त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गुरुवारी म्हटलं. कोविड परिस्थिती संदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

)







