• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • चिंता वाढली! राज्यात जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता

चिंता वाढली! राज्यात जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • Share this:
मुंबई, 29 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus in Maharashtra) अद्यापही कायम आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येला जरी ब्रेक लागला असला तरी बाधितांची दैनंदिन संख्या ही 60 हजारांहून अधिक असते. त्यातच आता राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता (Coronavirus third wave) वर्तवण्यात आल्याने चिंता आणखी वाढली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज पत्रकार परिषदेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भात अंदाज वर्तवला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "जुलै किंवा ऑगस्टमध्ये तिसरी लाट येईल असा अंदाज आहे. तेव्हा जिल्हयात ऑक्सिजन उपलब्ध होत नाही हे ऐकून घेतले जाणार नाही, तेव्हा तशी तयारी करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना दिले आहेत." वाचा: Maharashtra Lockdown: राज्यातील लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला 1 मेपासून लसीकरण होऊ शकत नाही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करायचे आहे मात्र, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हे लसीकरण होऊ शकत नाही. सीरमने केवळ तीन लाख डोससाठी खरेदीची ऑर्डर दिली आहे आणि इतकेसे डोस पुरेस नाहीयेत आम्हाला लसीकरणासाठी किमान 20 लाख डोसची आवश्यकता आहे. त्यामुळे 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्काळ सुरू केले जाऊ शकत नाही. राजेश टोपे पुढे म्हणाले, दोन दिवस मुंबईत लसीकरण थांबवले जाईल कारण लस उपलब्ध नाहीये. नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी केली असल्याचं दिसत आहे मात्र लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना परत जावे लागत आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आमच्याकडे आवश्यक तितका लसींचा साठा उपलब्ध नाहीये म्हणूनच आम्ही लसींच्या पुरवठ्यासाठी विनंती केली आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आम्ही त्यांचे स्वागत करतो. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता लॉकडाऊन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. या दरम्यान कठोर निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे.
Published by:Sunil Desale
First published: