मुंबई, 26 मार्च: भांडूपमधील ड्रीम्स मॉलला (Bhandup Dreams Mall Fire) आग लागल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. याठिकाणी असणाऱ्या सनराइज हॉस्पिटलला ही आग लागली होती. भांडूप पश्मिलेला असणाऱ्या या मॉलमध्ये आग लागून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही याठिकाणी (दुपारी 01.15 वाजता) आग धुमसतेच आहेत. काहीवेळापूर्वी पोलीस आयुक्त देखील पोहोचले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thacakrey) देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. धक्कादायक बाब म्हणजे 10 जणांचा मृत्यू (10 People died in Hospital Fire at Bhandup) या आगीत झाला असून याठिकाणाहून 32 कोरोना रुग्ण गायब आहेत. त्यामुळे सनकराइज रुग्णालयावर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होतो आहे.
मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'कोव्हिड काळात काही रुग्णालयांना परवानगी देण्यात आली होती, त्यापैकी हे एक रुग्णालय होतं. आपली आरोग्यसुविधा आणि वाढती साथ यामुळे राज्यभर जिथे शक्य असेल तिथे काही कोव्हिड सेंटर आणि रुग्णालयांना परवानगी दिली होती. या रुग्णालयाला दिलेली परवानगी येत्या 31 तारखेला संपणार आहे. दुर्दैवाने हॉस्पिटलच्या खालच्या मजल्यावर आग लागून ती आग पसरत वर पोहोचली. त्याठिकाणच्या कोरोना रुग्णांन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. पण जे रुग्ण व्हेंटिलेटरवर होते त्यांना हलवण्यासाठी नाही म्हटलं तरी थोडा अवधी लागला. दुर्दैवाने त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याबाबतीत चौकशी केली जाईल. यामध्ये कुणाचा दोष असेल तर कायद्याने त्यांच्यावर कारवाई केली जाईल.'
Action will be taken against those who are found responsible. Compensation will be given to families of the deceased. Most of the patients who have died were on the ventilator. I offer my condolences & seek apologies from affected families:Maharashtra CM, on Bhandup fire incident pic.twitter.com/ixQwia2U5o
— ANI (@ANI) March 26, 2021
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आगीत होरपळून मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांची माफी देखील मागितली. व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांचा या दुर्घटनेत अधिक मृत्यू झाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अशावेळी व्हेंटिलेटर बंद करणं किंवा त्याबाबत योग्य निर्णय घेणं कठिण असतंस असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबीयांकडे दिलगिरी व्यक्त केली असून या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदतही त्यांनी जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, स्थानिक आमदार सुनिल राऊत देखील उपस्थित राहून एकंदरित घडल्या प्रकाराची माहिती घेत होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी रात्रीच घटनास्थळाला भेट दिली होती.
एका मॉलमध्ये हॉस्पिटलसाठी परवानगी दिली जाते, शिवाय त्याठिकाणी कोव्हिड सेंटरला देखील परवानगी दिली जाते. त्यामुळे एकंदरितच प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याठिकाणी एकूण 78 रुग्ण होते. याठिकाणी असणाऱ्या 10 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित लोकांना इतर कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. मात्र गुरुवारी रात्री झालेल्या गोंधळामुळे काही रुग्ण याठिकाणाहून पळून गेले आहेत. पालिका प्रशासन त्यांना ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chief minister, Maharashtra, Mumbai, Mumbai fire station, Uddhav thacakrey