जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / VIDEO: वाहतूक पोलिसाशी भररस्त्यात पंगा: धमकावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ढसाढसा रडवलं

VIDEO: वाहतूक पोलिसाशी भररस्त्यात पंगा: धमकावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ढसाढसा रडवलं

VIDEO: वाहतूक पोलिसाशी भररस्त्यात पंगा: धमकावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ढसाढसा रडवलं

Crime in Mira bhayandar: भररस्त्यात पोलिसांना शिवीगाळ (Abuse) करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी तुरुंगात टाकून ढसाढसा रडवलं आहे. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मीरा भायंदर, 09 जुलै: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Viral video) वेगानं व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एक तरुण आणि तरुणी एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याशी (Traffic Police) वाद घालताना दिसत आहेत. चारचाकी वाहनाला पोलिसानं जामर लावल्यानं भडकलेल्या तरुणानं कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाला वाद घालून कपडे फाडून उभं चिरण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणाला अटक (arrest) केली आहे. भररस्त्यात पोलिसांना शिवीगाळ (Abuse) करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी तुरुंगात टाकून ढसाढसा रडवलं आहे. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. संबंधित तरुण-तरुणी मीरा भायंदर येथील एका रस्त्यावर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. वाद घालणाऱ्या 36 वर्षीय तरुणाचं नाव अरुण रतन सिंह तर तरुणीचं नाव मीना अरुण सिंग असून ते दोघं पती पत्नी आहेत. दोघं पती-पत्नी आपल्या कारने मीरा भायंदर रोडवरील कारचे एक्ससरिज वस्तू विकणार्‍या दुकानात आले होते. दरम्यान त्यांनी आपली कार नो पार्कींग परिसरात पार्क केली होती.

जाहिरात

हेही वाचा- भररस्त्यात व्यावसायिकावर गोळ्यांचा वर्षाव, गोळीबाराचा LIVE VIDEO त्यावेळी काशी मीरा वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार, कुष्णा बाळासाहेब दबडे यांनी अरुणच्या चारचाकी गाडीला जॅमर लावला. कारला जामर लावल्यानं संतापलेल्या अरुणनं ट्रॅफिक कॉन्स्टेबलला अपमानास्पद शब्दांत गैरवर्तन केलं. तसेच वर्दी उतरवून माझ्याशी दोन हात कर अशी आव्हानदेखील दिलं. शिवाय तुझी वर्दी उतरवून तुला मध्यभागातून चिरेल अशी धमकी देखील दिली. ही सर्व घटना टोविंग व्हॅनमधील एका तरुणानं आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली.

हेही वाचा- धक्कादायक! पुण्यात महिलांचं रक्षण करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकालाच मारहाण आरोपी तरुणासोबत असणाऱ्या त्याच्या पत्नीनं देखील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. संबंधित व्हायरल व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी अरुण रतन सिंह याच्यावर मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भररस्त्यात पोलिसांशी वाद घालणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेऊन ढसाढसा रडवलं आहे. संबंधित तरुणाचा जमीनीवर बसून रडतानाचा व्हिडीओ देखली सोशल मीडियात व्हायरल होतं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात