गुरुवारी नवी मुंबई येथील कळंबोली भागात सिडकोच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या 15 हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यात तयार झालेल्या घरांचं वाटप लाभार्थ्यांना करण्यात आलं. याप्रसंगी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, खासदार राजन विचारे उपस्थित होते. हेही वाचा- पाकिस्तानला सतावतीये दोन वेळच्या अन्नाची चिंता; इम्रान खान यांनी व्यक्त केली भीती दोन वर्षांपूर्वी सिडकोकडून 15 हजार घरांची लॉटरी काढण्यात आली होती. मात्र प्रकल्प रखडल्यानं लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. मात्र राज्य सरकारनं मध्यस्थी घेऊन कोरोना काळात लोकांना घरांचा ताबा देण्याचे आदेश सिडकोला दिले. त्यानंतर गुरुवारपासून घराचं वाटप सुरु झालं आहे.अल्प व अत्यल्प उत्पन्न गटात बांधलेल्या या घरांचा दर्जा चांगला असून सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असून या घरासाठी ५वर्षे कोणताही मेंटेनन्स लागणार नाही. pic.twitter.com/FYmNqmMrYn
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 1, 2021
सिडकोद्वारे नवी मुंबई, पनवेल, उरण भागात घरांची निर्मिती होणार असल्याच सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांनी सांगितलं. येत्या काळात सिडकोकडून 89 हजार घरांची बंपर लॉटरी काढणार असल्याचे यावेळी सिडको एमडी संजय मुखर्जी यांनी जाहिर केलं. त्यामुळे 1 लाख 4 हजार घरांची निर्मिती सिडको येत्या काळात करणार आहे.नवी मुंबई येथील #कळंबोली भागात @CIDCO_Ltd च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या १५००० घरांपैकी पहिल्या टप्प्यात तयार झालेल्या घरांचं वाटप आज लाभार्थ्यांना करण्यात आलं. याप्रसंगी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, खासदार @rajanvichare उपस्थित होते.#CIDCO #Kalamboli pic.twitter.com/2VTVXSBT9D
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 1, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde