मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /VIDEO : हॉटेलमध्ये नाना पटोलेंच्या खांद्यावर महिलेचं डोकं असलेला व्हिडीओ, चित्रा वाघ यांचं ट्विट

VIDEO : हॉटेलमध्ये नाना पटोलेंच्या खांद्यावर महिलेचं डोकं असलेला व्हिडीओ, चित्रा वाघ यांचं ट्विट

नाना पटोले यांचा मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.

नाना पटोले यांचा मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.

नाना पटोले यांचा मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.

मुंबई, 20 जुलै : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नेटकऱ्यानी आज चांगलेच ट्रोल केले आहे. मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी नानांच्या विरोधात टीकेची झोड उठलेली आहे. दरम्यान, नाना पटोले यांच्याशी संबंधित हा व्हिडीओ आणि फोटो कितपत खरा आहे याची पडताळणी न्यूज १८ लोकमतने केलेली नाही. आम्ही या फोटोची पुष्टी करत नाही.

विशेष म्हणजे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांचा महिलेसोबतचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत सवाल विचारला आहे. चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांच्या व्हिडीओ विषयी पत्रकार परिषद देखील घेतली आहे.

मात्र या दरम्यान नाना पटोले यांना विचारपूस केली असता त्यांनी हे भाजपचं कट कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचा उल्लेख नाना पटोले यांनी केला आहे.

चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

"नाना पटोले यांचा समोर आलेला व्हिडीओ धक्कादायक आहे. सोलापूर, रायगड, नाना पटोले असूदे किंवा कोणताही पक्ष असूदे ज्यावेळी तुम्ही लोकप्रतिनिधी असता तेव्हा तुमची जबाबदारी कित्येकपटीने वाढलेली असते. सर्वांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. यातून लोकप्रतिनिधींकडून लोकांनी काय बोध घ्याला? असा प्रश्न उपस्थित होतोय", असं चित्रा वाघ म्हणाले.

(OBC आरक्षणाचं श्रेय नेमकं कुणाचं? पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर)

"कुणाच्या खासगी आयुष्यात डोकावणं चुकीचंच आहे. पण ती गोष्ट जेव्हा लोकांमध्ये येते, सार्वजनिक होते त्यावेळी ती खासगी राहत नाही. आज सकारळपासून तो व्हिडीओ व्हायरल झाला नंतर माझ्याकडे आला. म्हणून मी नानांना विचारलं की नाना तुम्हीपण?", अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.

"राजकारणात आज ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याबद्दल आम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तो व्हिडीओ माझ्याकडे आल्यानंतर मी सुद्धा नाना पटोले यांना विचारलं की नक्की काय आहे? त्यांच्याकडून याबाबत काही स्पष्टीकरण आलेलं नाही", असं चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितलं.

First published:

Tags: BJP, Chitra wagh, Nana Patole