मुंबई, 6 जानेवारी : गोधडी ही आपली सांस्कृतिक ओळख आहे. याच गोधडी मध्ये मुंबई तील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल मध्ये मंथन आर्ट स्कूल आणि मदर क्विल्ट्सने मिळून 20 फूट लांबी रुंदीची छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती साकारली आहे. या कलाकृती मध्ये विवध कापडांच्या रंगीबेरंगी तुकड्यांचा वापर करण्यात आला आहे. कशी केली निमिर्ती? मंथन आर्ट स्कूलचे शशिकांत गवळी सांगतात की, मंथन आर्ट स्कूल ही पुणे, मुंबई, रत्नागिरी मध्ये कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांपासून शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवल मध्ये मंथन आर्ट स्कूल वेगवेगळ्या कलाकृती सादर करत असते. यावर्षी भव्य दिव्य काही तरी करायचं असा विचार केला असता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा संक्षिप्त अभ्यास केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची संकल्पना आणि शपथ घेतली व ती संकल्पना साकारण्यासाठी महाराजांनी अठरा पगड जातींच्या लोकांना, विविध पंथाना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यातून स्वराज्याची निर्मिती झाली.
गोधडी ही आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. ज्याप्रमाणे गोधडी कापडाच्या वेगवेगळ्या तुकड्यांनी जोडली जाते. त्याला प्रेमाच्या धाग्याने विणली जाते. तश्याच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची निर्मिती केली. हीच संकल्पना घेऊन 20×20 फुटाची ही गोधडी साकारण्यात आली आहे. नऊ सांकेतिक चिन्ह, दोन ध्वज, संदेश असे या कलाकृती मध्ये पाहायला मिळतात. गावागावातल्या महिलांना एकत्र करून ही गोधडी तयार करण्यात आली आहे. आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भव्य दिव्य एक युग पुरुष माहिती आहेत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली कार्य काय आहेत. आजच्या घडीला या कार्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम घडतो. हे दर्शविणारे काही सांकेतिक चिन्ह या गोधडीमध्ये वापरलेले आहेत, असं शशिकांत गवळी यांनी सांगितले. गोधडीचा व्यवसाय सुरू केला नीरज बोराटे सांगतात की, 2014 मध्ये इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण झाल्यावर 2015 साली दोन करागिरांसोबत गोधडीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला 5 - 6 वर्ष विरोध झाला. इंजिनिअरिंगच शिक्षण घेऊन गोधड्यांचा व्यवसाय का ? पण हेच आधार आणि काही तरी नवीन करून दाखविण्याची वेळ होती. वेगवेगळ्या राज्यातील कारागिरांचा शोध घेऊन आतापर्यंत साडे तीनशे कारागिरांना बरोबर काम सुरू आहे.
Shiv Jayanti 2023 : तब्बल 21 फुटांची कवड्यांची माळ ठरणार शिवजयंतीचं खास आकर्षण, Video
50 कारागीर काम करत होते पुढे सांगतात की, ही संकल्पना ज्यावेळी शशिकांत सरांकडून आली. त्यावेळी यावर काम सुरू झालं सुरुवातीला अवघड वाटणारी कलाकृती चॅलेंज म्हणून स्वीकारली. ही कलाकृती तयार करण्यासाठी दीड महिना 50 कारागीर काम करत होते. त्याच बरोबर 5 लाखांपेक्षा जास्त टाके, 1000 पेक्षा जास्त कापडी तुकड्यांचा वापर करून ही कलाकृती 20×20 फूट तयार करण्यात आली. आज पर्यंत हात शिलाईने त्यात केलेली एवढी मोठी कलाकृती आज पर्यंत तायार झालेली नाही.