जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shiv Jayanti 2023 : तब्बल 21 फुटांची कवड्यांची माळ ठरणार शिवजयंतीचं खास आकर्षण, Video

Shiv Jayanti 2023 : तब्बल 21 फुटांची कवड्यांची माळ ठरणार शिवजयंतीचं खास आकर्षण, Video

Shiv Jayanti 2023 : तब्बल 21 फुटांची कवड्यांची माळ ठरणार शिवजयंतीचं खास आकर्षण, Video

Shiv Jayanti 2023 : तब्बल 21 फुटांची कवड्यांची माळ शिवजयंतीचं खास आकर्षण ठरणार आहे.

  • -MIN READ Nashik,Nashik,Maharashtra
  • Last Updated :

    विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी नाशिक, 6 फेब्रुवारी :  नाशिक छत्रपती सेनेच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यात आदर्श शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. यंदाही शिवजन्माेत्सवाला‎ नाशिककरांना 21 फूट लांबीची, 71‎ किलाे वजनाची, 64 कवड्यांची माळ पाहायला मिळणार आ‎हे. ‎ही माळ तयार करण्यात आली असून विश्वविक्रमात नोंद होण्यासाठी सेनेकडून माळेची नोंदणी करण्यात आल्याची माहिती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार यांनी दिली आहे.  भव्य कवड्यांची माळ छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जनेतपर्यंत पोहचला पाहिजे. त्यांनी केलेलं कार्य जनमानसात पोहोचावं. त्यांचा खरा इतिहास नागरिकांनी समजून घ्यावा हा या मागचा हेतू आहे. छञपती शिवाजी महाराज, छञपती संभाजी महाराज कवड्यांची माळ घालायचे. त्यामुळे कवड्यांच्या माळेला विशेष महत्व आहे. त्यामुळे यंदा भव्य कवड्यांची माळ साकारण्याचा निर्णय छञपती सेनेने घेतला.

    News18लोकमत
    News18लोकमत

    21 फुटी माळेत 64 कवड्यांचा वापर करण्यात आला असून कवडीची उंची 1.25 फूट आहे. तर वजन 71 किलो आहे. 17 फेब्रुवारीला सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज (शिवतीर्थ) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती तानाजी मालुसरे यांचे 13 वे वंशज डॉ. शीतल मालुसरे यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता या माळेचे अनावरण करण्यात येणार असल्याचे चेतन शेलार यांनी सांगितले. या आधीही विश्वविक्रम जिरेटोप, भवानी तलवार, टाक, वाघनखे, कट्यार या भव्य वस्तू शिवजयंतीला साकारून त्याची विश्वविक्रमात नोंद करण्यात आली आहे. या महाकाय वस्तू नाशिकमध्ये शिवजयंतीची शोभा वाढवतात. तसेच या वस्तू आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. शेकडो शिवभक्त हा नवा विक्रम बघण्यासाठी शिवजयंतीला नाशिकमध्ये येत असतात.

    Bamboo Farming : आयटी क्षेत्रातील तरुणानं बांबू शेतीमध्ये केला जागतिक रेकॉर्ड! पाहा Video

    इतिहास घराघरात पोहचवण्याचा संकल्प स्वराज्य निर्माण करण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी छञपती शिवाजी महाराज, छञपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी आपलं  बलिदान दिलं आहे. रक्ताच पाणी करून ते आपल्यासाठी लढले आहेत. तरीही मात्र सद्याच्या परिस्थितीत काही लोक चुकीचा इतिहास सांगून सामान्य माणसाची दिशाभूल करत आहेत. म्हणूनच आमचा प्रयत्न आहे की अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास पोहचला पाहिजे. त्यांनी त्या काळात वापरलेल्या वस्तू, कशा होत्या, त्या वस्तूंचं महत्व काय आहे ? हेच पटवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा शिल्पा सोनार यांनी दिली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात