मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Shivjayanti 2021: राज ठाकरेंची रयतेच्या राजाला खास मानवंदना; स्वतःच्या आवाजात शेअर केला VIDEO

Shivjayanti 2021: राज ठाकरेंची रयतेच्या राजाला खास मानवंदना; स्वतःच्या आवाजात शेअर केला VIDEO

Chhatrapati Shivaji Maharaj jayanti 2021: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंती विशेष स्वतःच्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांवर व्हिडीओ बनवून महाराजांना अभिवादन केलं आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj jayanti 2021: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंती विशेष स्वतःच्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांवर व्हिडीओ बनवून महाराजांना अभिवादन केलं आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj jayanti 2021: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंती विशेष स्वतःच्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांवर व्हिडीओ बनवून महाराजांना अभिवादन केलं आहे.

मुंबई, 19 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती ( Chhatrapati Shivaji maharaj Jayanti ) निमित्त संपूर्ण राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. शिवजयंती (shivjayanti) निमित्त लोकं एकमेकांना शुभेच्छा देत आहेत पण सगळ्याचं लक्ष वेधून घेतलंय ते मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच त्यांच्या वेगळ्या अंदाजासाठी आणि ठाकरे शैलीसाठी ओळखले जातात. त्याचबरोबर ते एक उत्तम कलाकार देखील आहेत. आता शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा सांगणारा एक व्हिडीओ स्वतःच्या आवाजात बनवून खास शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन सुभाषचंद्र बोस आपल्या सहकाऱ्यांना कसं पटवून देतात हे सांगताना दिसून येतंय.

'ह्या हिंदभूमीवरील स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा म्हणजे शिवछत्रपती... कालही, आजही आणि उद्याही!’ असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांना खास अभिवादन करण्यात आलं आहे.

'एके दिवशी सुभाषचंद्र बोस हे सिंहगडावरती आले होते.त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन! त्यांत काही बंगाली कवी होते, लेखक होते. आणि सुभाषबाबूंनी त्या लेखकांना सांगितलं की जर काही लिहायचं असेल तुम्हाला आयुष्यात तर ‘शिवाजी’ या तीन अक्षरांबाबत लिहा. जर कविता करायच्या असतील तर या माणसावरती करा. यांच्यावर तुम्ही जेवढ लिहाल, जेवढं लोकांपर्यंत पोहचेल तेवढं तेवढं स्वातंत्र्य आपल्या जवळ यायला लागेल.' असा संदेश देऊन स्वातंत्रलढ्यासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांचं योगदान किती महत्वाचं होत हे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या व्हिडीओद्वारे केला गेला आहे.

First published:

Tags: BJP, Chhatrapati shivaji maharaj, PM narendra modi, Raj thakre, Shivjayanti, Viral video., छत्रपती शिवाजी महाराज