मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

छगन भुजबळ पुन्हा दिल्ली दौऱ्यावर; OBC Reservation संदर्भात घेणार महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी

छगन भुजबळ पुन्हा दिल्ली दौऱ्यावर; OBC Reservation संदर्भात घेणार महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर आहेत. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरुन सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) सुरु असलेल्या सुनावणीबाबत ते दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

नवी दिल्ली 28 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर आहेत. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरुन सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) सुरु असलेल्या सुनावणीबाबत ते दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळीही ते ओबीसी आरक्षणासाठी महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. एकाच आठवड्यात ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ दुसऱ्यांदा दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत.

या नेत्यांनी आणला भाजप-शिवसेनेत दुरावा; संजय राऊतांनी सांगितलं 25 वर्षांचं नातं

भुजबळ ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावणार आहेत. छगन भुजबळांच्या हस्ते शरद यादव यांचादेखील सत्कार होणार आहे. सोबतच ते लालू प्रसाद यादव यांची देखील भेट घेणार आहेत. रविवारी समता परिषदेची दिल्लीत बैठक होणार आहे.

LIVE: पटोले आज पक्षश्रेष्ठींच्या भेटीला, काँग्रेस कार्यकारणी नियुक्तीनंतर नाराजी

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे यावर सर्वपक्षांचे एकमत झाले आहे. बैठकीत प्राप्त सूचना आणि पर्यायांचा येत्या काही दिवसांमध्ये अभ्यास करून पुढील शुक्रवारी यासंबंधाने सर्व सहमतीने निर्णय घेऊ, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackeray) यांनी बैठकीत दिली . विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह सर्व नेत्यांनी आरक्षण टिकवून ठेवण्यासाठीचे पर्याय, सूचना यासंबंधातील आपली मतेही या बैठकीत मांडली.

या बैठकीला अजित पवार, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे,  विजय वडेट्टीवार, अॅड.अनिल परब, प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस, कपिल पाटील, देवेंद्र भुयार यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

First published:

Tags: Chagan bhujbal, ओबीसी OBC