मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल, सरनाईकांची सोमय्यांवर विखारी टीका

केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल, सरनाईकांची सोमय्यांवर विखारी टीका

'केंद्रीय यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे "माजी खासदार" झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे'

'केंद्रीय यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे "माजी खासदार" झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे'

'केंद्रीय यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे "माजी खासदार" झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे'

मुंबई, 20 जून: महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोपांची मालिकाच सुरू केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांना एक स्फोटक पत्र लिहिले आहे. या पत्रात 'केंद्रीय तपास यंत्रणेचे दलाल आणि शिवसेनेमुळे माजी खासदार झाले' असं म्हणत सरनाईक यांनी सोमय्यांवर (Kirit Somaiya) विखारी टीका केली.

प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रताप सरनाईक हे गायब झाले होते, पण आता अचानक एक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्फोटक पत्र लिहून खळबळ उडवून दिली आहे. या पत्रात सरनाईक यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली आहे.

कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे "माजी खासदार" झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे त्याला कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबीयांवर सुद्धा सतत आघात होत आहे, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंजवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल, अशी मागणीच सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

तर, सरनाईक यांच्या टीकेला किरीट सोमय्यांनी उत्तर दिले आहे. प्रताप सरनाईक यांनी घोटाळा केला आहे, त्यांना जेलचा दरवाजा दिसत आहे. अनिल परब यांनी चुकीच्या जागी रिसॉट बांधला आहे, त्यामुळे जेलचा रस्ता दिसायला लागला म्हणून केंद्रीय तपास यंत्रणेवर आरोप केला जात आहे, असा पलटवार सोमय्यांनी केला.

'भाजपशी जुळवून घ्या'

तसंच, 'पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो.' असंही सरनाईक म्हणाले आहे.

First published:

Tags: Kirit Somaiya, Mumbai, Pratap sarnaik, Uddhav thackeray