मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोठी बातमी, अनिल देशमुखांवर दिल्लीमध्ये गुन्हा दाखल, FIR मध्ये धक्कादायक माहिती!

मोठी बातमी, अनिल देशमुखांवर दिल्लीमध्ये गुन्हा दाखल, FIR मध्ये धक्कादायक माहिती!

सचिन वाझे (Sachin vaze) यांच्या नियुक्तीत अनिल देशमुख यांचा हात असल्याचेही FIR कॉपीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मुंबई, 24 एप्रिल :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोप प्रकरणी सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे.

सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरची कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. अनिल देशमुख यांच्यावर दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला. तसंच अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे.  अनिल देशमुख यांचं नाव आरोपी म्हणून एफआयआरमध्ये नोंद करण्यात आले आहे.

कोरोनाच्या व्हॅक्सिनच्या किमतीवर प्रश्न विचारताच फरहान अख्तर ट्रोल! काय आहे कारण

तसंच, सचिन वाझे यांच्या नियुक्तीत अनिल देशमुख यांचा हात असल्याचेही FIR कॉपीमध्ये नमूद करण्यात आले आहे. एवढंच नाहीतर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका सुद्धा अनिल देशमुखांवर करण्यात आला आहे. दरम्यान, सीबीआयच्या पथकाने अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले आहे.

कोरोनाच्या डबल म्युटंट व्हेरियंटचं सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात, लस किती प्रभावी

आज सकाळपासून अनिल देशमुख यांच्या मुंबई (Mumbai) आणि नागपूर (Nagpur) येथील निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने छापे मारले आहे. आताही कारवाई थांबवण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या नेते भडकले!

तर, न्यायालयानं 100 कोटीच्या खंडणी प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्याची सीबीआयला परवानगी दिली होती. पण सीबीआय धाडी टाकून या परवानगीचा गैरवापर अनिल देशमुख यांच्या बदनामीसाठी करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी ट्विट करत सरकारला धारेवर धरलं. उच्च न्यायालयाने चौकशीचा अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. पण सीबीआय अतिरेक करत आहे, असं म्हणताच दया..कुछ तो गडबड जरूर है. असा टोला या कारवाईवरून लगावला आहे.

राष्ट्रवादीने केला कारवाईचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकार या माध्यमातून राजकीय उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली आहे. 'प्राथमिक चौकशीतून काय समोर आले हे कोर्टासमोर मांडण्याआधीच होत असलेल्या या कारवाईचा त्यांनी निषेध केला. अशा धाडी राजकीय नेत्यांना बदनाम करण्यासाठी असल्याचंही ते म्हणाले. तसंच 'अनिल देशमुख यांनी तपासात सहकार्य केल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं.

First published:
top videos

    Tags: CBI