मुंबई, 24 एप्रिल : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर वाढलेला असतानाच कोविशिल्ड व्हॅक्सिनची (Covishield-Vaccine) किंमत देखील वाढली आहे. देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याची घोषणा सरकारनं केली आहे. त्यावेळी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (Serum Institute Of India) खासगी हॉस्पिटलमध्ये 600 रुपयांना व्हॅक्सिन देण्याची घोषणा केली आहे. हे व्हॅक्सिन 18 वर्षांच्या वरील व्यक्तीला सरकारी हॉस्पिटलमध्ये 400 तर खासगी हॉस्पिटलमध्ये 600 रुपयांना मिळणार आहे. तर केंद्र सरकारला मात्र हे व्हॅक्सिन पूर्वीप्रमाणेच 150 रुपयाला मिळणार आहे. फरहान अख्तरनं विचारला प्रश्न कोरोना व्हॅक्सिन यापूर्वी फक्त केंद्र सरकार खरेदी करत होतं. आता राज्य सरकारही खरेदी करणार आहे. ही बातमी येताच चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तरनं (Farhan Akhtar) या विषयावर नाराजी व्यक्त केली असून सिरम इन्स्टिट्यूला प्रश्न विचारला आहे. भारतामध्ये अन्य कोणत्याही देशापेक्षा व्हॅक्सिन महाग का आहे? असा प्रश्न फरहाननं विचारला.
After saying that you were making profit even at 150/vaccine, we will now be asked to pay the most of any country for it. Please explain why @SerumInstIndia pic.twitter.com/ozFXXlHIDG
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) April 24, 2021
फरहानच्या या ट्विट्सवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी फरहानला पाठिंबा दिलाय. तर काही युझर्सनी त्याला ट्रोल केलं आहे. ही किंमत फक्त खासगी हॉस्पिटलसाठी आहे, ते तुला समजणार नाही अशी प्रतिक्रिया एका युझरनं दिली आहे.
Don't make 'Profit' a sin word. It is needed in the economy. 4.Still I agree that paying Rs1200/person can be difficult for poor. For them state/centre can subsidies. Affluent people like you can sponsor 100 people by just donating Rs0.12mn. 2/n
— keyur pandya (@k_e_y_u_r) April 24, 2021
फरहान अख्तर यापूर्वी स्काय इज पिंक या सिनेमात दिसला होता. आता त्याचा उडान हा सिनेमा लवकरच Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर मार्व्हल स्टुडिओच्या मिस मार्व्हल या सिनेमातही त्याची भूमिका आहे.