मराठी बातम्या /बातम्या /देश /

दाऊद इब्राहिमनं जान मोहम्मदला पाठवलं होतं बहरीनला, दिली होती अली बुदेशची मारण्याची सुपारी

दाऊद इब्राहिमनं जान मोहम्मदला पाठवलं होतं बहरीनला, दिली होती अली बुदेशची मारण्याची सुपारी

अटक केलेल्या दहशतवाद्यांचा (Terrorist)  दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim)भाऊ अनीस इब्राहिमशी संबंध असल्याचे दिल्ली पोलिसांनी आधीच सांगितलं आहे.

अटक केलेल्या दहशतवाद्यांचा (Terrorist) दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim)भाऊ अनीस इब्राहिमशी संबंध असल्याचे दिल्ली पोलिसांनी आधीच सांगितलं आहे.

अटक केलेल्या दहशतवाद्यांचा (Terrorist) दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim)भाऊ अनीस इब्राहिमशी संबंध असल्याचे दिल्ली पोलिसांनी आधीच सांगितलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) टेरर मॉड्यूल (Terror Module)चा पदार्फाश केला. त्यानंतर नवनवे खुलासे होत आहेत. अटक केलेल्या दहशतवाद्यांचा (Terrorist) दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim)भाऊ अनीस इब्राहिमशी संबंध असल्याचे दिल्ली पोलिसांनी आधीच सांगितलं आहे. आता याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी जान मोहम्मद शेख उर्फ ​​समीर कालियाला 2019 मध्ये एका गँगस्टरची हत्या करण्यासाठी बहरीनला पाठवण्यात आलं होतं. दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय फहीम मचमच याने बहरीनमध्ये अली बुदेश नावाच्या गँगस्टरला मारण्यासाठी जान मोहम्मदला सुपारी दिली होती.

मित्रानेच तोडले हात-पाय, शिरही केलं धडावेगळं, मुंबईतील थरारक घटनेचं उलगडलं गूढ

अली बुदेशला मारण्यासाठी दाऊदनं छोटा शकीलला सांगितलं होतं. छोटा शकीलनं याची जबाबदारी फहीम मचमचकडे सोपवली होती. फहीम मचमचने यासाठी जान मोहम्मदला पैसेही दिले होते. क्राईम ब्रांन्चच्या सुत्रांनी सांगितल्यानुसार, काही दिवस जान मोहम्मद बहरीनमध्ये राहिला. पण जेव्हा अली बुदेशची स्थिती पाहिली तेव्हा जान मोहम्मदला भीती वाटली. त्याला वाटलं की, त्यानं अली बुदेशची हत्या केली तर तो भारतात परत जाऊ शकणार नाही.

'सोनू सूदवर आयकर धाडी म्हणजे रडीचा डाव', शिवसेनेचा विरोधकांवर निशाणा

गँगस्टर अली बुदेश आधी दाऊदसोबत काम करायचा, पण नंतर दाऊदच्या टोळीशी मतभेद झाल्यानंतर त्याने पाकिस्तानात दाऊदच्या शत्रूंशी हात मिळवणी केली आणि बहरीनमध्ये स्थायिक झाला. त्यानंतर अलीनं दाऊदच्या टोळीशी संबंधित सर्व गुप्त माहिती पोलिसांना द्यायला सुरुवात केली, त्यानंतर दाऊदने छोटा शकीलला अली याला काटा काढण्यास सांगितलं. गँगस्टर अली बुदेश 80 च्या दशकात खूप सक्रिय होता, पण नंतर मुंबई पोलिसांच्या भीतीने 90 च्या दशकात परदेशात पळून गेला.

दहशतवाद्यांना रेल्वे लाईन-ब्रिज उडवण्याचं दिलं होतं ट्रेनिंग

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मॉड्यूलचा भाग असलेल्या दहशतवाद्यांना रेल्वे लाईन न (Railway Line) आणि पूल उडवण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं. यासह, मोठा मेळावा देखील त्यांच्या निशाण्यावर होता. आता या प्रकरणात स्लीपर सेलची भूमिकाही समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी गेले होते, पण त्यांच्या पासपोर्टवर शिक्का नव्हता, अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे. त्यांनी ग्वाहर बंदराहून सागरी मार्ग निवडला. ओमानहून पाकिस्तानला जात असताना त्यांनी मोटरबोटही मध्येच बदलली.

First published:

Tags: Dawood ibrahim, Terrorists