• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • पाळीव पोपट मालकीणीला मिळवून देणार न्याय; बलात्कार अन् हत्याप्रकरणी कोर्टात देणार साक्ष

पाळीव पोपट मालकीणीला मिळवून देणार न्याय; बलात्कार अन् हत्याप्रकरणी कोर्टात देणार साक्ष

(File Photo)

(File Photo)

मालकीणीचा बलात्कार आणि हत्या प्रकरणात (rape and murder case) या पोपटाची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे. प्रत्यक्षदर्शी (parrot will be main witness) म्हणून या पोपटाला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

 • Share this:
  ब्यूनस आयर्स, 17 सप्टेंबर: आतापर्यंत कोर्टात फक्त नातेवाईक आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष घेण्यात येत होती. पण इतिहासात पहिल्यांदाच कोर्टात एका पोपटाची साक्ष ग्राह्य धरली जाणार आहे. मालकीणीचा बलात्कार आणि हत्या प्रकरणात (rape and murder case) या पोपटाची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे. संबंधित घटना घडत असताना हा पोपट घटनास्थळी असल्यानं प्रत्यक्षदर्शी (parrot will be main witness) म्हणून या पोपटाला कोर्टात हजर केलं जाणार आहे. ‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना अर्जेंटीनातील असून एलिझाबेथ टोलेडो असं बलात्कार आणि हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे.  मृत एलिझाबेथ ही अन्य दोन लोकांसोबत एका भाड्याच्या घरात राहत होती. एलिझाबेथ यांचा बलात्कार आणि हत्या त्यांच्या जवळच्याच व्यक्तीनं केल्याचा संशय पोलिसांना होता. पण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास आणि चौकशी केली असता, कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही. पण आता पोपटाची साक्ष कोर्टात ग्राह्य धरून दोषींना शिक्षा केली जाऊ शकते. हेही वाचा-मित्रानेच तोडले हात-पाय, शिरही केलं धडावेगळं, मुंबईतील थरारक घटनेचं उलगडलं गूढ अशाप्रकारे पोपट बनला साक्षीदार संबंधित वृत्तानुसार, पोलीस घटनास्थळी जाऊन तपास करत असताना, एक पोपट काहीतरी बोलत असल्याचं पोलीस कर्मचाऱ्याने ऐकलं होतं. त्यामुळे पोलिसांना वाटलं की, पोपटाची साक्ष कोर्टात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. त्यानुसार पोलिसांनी अर्जेंटिनातील सॅन इसिद्रो येथील न्यायालयाला सांगितलं की पोपट काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. हे शब्द पोपटाच्या मालकीणीची शेवटचे शब्द असू शकतात. 'नाही, प्लिज मला जाऊ द्या, मला का मारत आहात?' अशी आशयचा पोपट उच्चार करत होता. अशा प्रकारे पोपट बोलताना काही शेजारच्यांनी देखील ऐकलं आहे. हेही वाचा-मुंबईत विकृताकडून तरुणीचा छळ; फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर बदनामी जन्मठेप होण्याची शक्यता पोलिसांच्या मते, एलिझाबेथ टोलेडो यांनी मरण्यापूर्वी आरोपीकडे केलेली विनवणी पोपटाने लक्षात ठेवली आहे. त्यानंतर त्यानं त्या शब्दांचा पुन्हा पुन्हा उच्चार करायला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी 53 वर्षीय मिगुएल रोलन आणि 65 वर्षीय जॉर्ज अल्वारेझ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोघंही दोषी आढळल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता आहे. पोपटाच्या साक्ष व्यतिरिक्त, पोलिसांना मृत महिलेच्या डीएनए रिपोर्टमधून महत्तावाचा पुरावा हाती लागला आहे. आरोपींनी 2018 मध्ये एलिझाबेथ टोलेडो यांच्यावर त्यांची निर्घृण हत्या केली होती.
  Published by:News18 Desk
  First published: