• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज सूप वाजणार, शेवट होणार का गोड?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज सूप वाजणार, शेवट होणार का गोड?

तरीही प्रत्यक्ष सभागृह सुरू झाल्यानंतर नेमकी विरोधक काय भूमिका घेतात, हे पाहणे ही सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे.

  • Share this:
मुंबई, 10 मार्च : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची (Maharashtra Budget session 2021) आज सांगता होणार आहे. 1 ते 10 मार्च अशा 10 दिवसीय अधिवेशनात 8 दिवसांचे कामकाज होतं. त्यातला आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसभरात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विधानसभेत अर्थसंकल्पावर (Maharashtra Budget 2021) चर्चा असणार आहे. यात खातेनिहाय चर्चा होणार आहे. २४ खात्यांबद्दल चर्चा होणं अपेक्षित आहे. याशिवाय विरोधी पक्षातर्फे नियम 296 अन्वये मांडण्यात आलेल्या कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर चर्चेला गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे उत्तर देतील. याशिवाय नियम २९२ अन्वये विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, त्यावरही चर्चा अपेक्षित आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वांकांक्षी प्रकल्प असलेल्या 33 कोटी वृक्ष लागवड विशेष मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी केली जाणार असल्याची घोषणा सरकारतर्फे केली गेली होती. त्या समितीचीही आज स्थापना केली जाणार आहे. हे असं सगळं कामकाज जरी कागदावर दिसत असलं तरीही प्रत्यक्ष सभागृह सुरू झाल्यानंतर नेमकी विरोधक काय भूमिका घेतात, हे पाहणे ही सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. मुंबईकरांवर लॉकडाऊनचं संकट? तयारी पूर्ण आयुक्तांनी दिले संकेत मंगळवारच्या दिवसात प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर मनसुख हिरेन प्रकरणात विधानसभेचे  विरोधी पक्षनेते यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी केली आणि त्यानंतर एकच गदारोळ उडाला होता. या मागणीनंतर सभागृहाचं फारसं कामकाज होऊ शकले नव्हतं. तब्बल 8 वेळा सभागृह तहकूब करावं लागलं होतं. कालही कामकाज स्थगित झाल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना या प्रश्न आजही लावून धरण्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आजही या प्रकरणाचे पडसाद सभागृहात उमटत राहील अशीच चिन्हं आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असतानाही दिला निगेटिव्ह रिपोर्ट; पोलिसांकडून कंपनीचा पर्दाफाश सरकारने तूर्तास तरी वाझे यांच्यावर कारवाईची कोणतीही भूमिका घेतलेली नाही. विरोधी पक्ष आक्रमक राहिल्यास आजचे कामकाज पुढे नेण्यासंदर्भात आजचे फ्लोअर मॅनेजमेंट कसं करावं याबद्दल काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा झाल्याचं समजते. काल विरोधी पक्षाच्या आक्रमक भूमिकेला आक्रमकपणे उत्तर देण्याची भूमिका सत्ताधारी पक्षाने दाखवली होती. परंतु यात कामकाज मात्र होऊ शकलं नव्हतं. आज अर्थसंकल्प मंजूर करुन घेताना राज्य सरकार कोणते डावपेच आखतंय, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
Published by:sachin Salve
First published: