जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : 'बुलेट पांड्या', हार्दिकच्या दोन रन आऊटने फिरवली मॅच, भन्नाट VIDEO

IPL 2021 : 'बुलेट पांड्या', हार्दिकच्या दोन रन आऊटने फिरवली मॅच, भन्नाट VIDEO

IPL 2021 : 'बुलेट पांड्या', हार्दिकच्या दोन रन आऊटने फिरवली मॅच, भन्नाट VIDEO

IPL 2021 हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) अफलातून फिल्डिंगमुळे मुंबईने सामन्यात पुनरागमन केलं. डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि अब्दुल समद (Abdul Samad) यांच्या रन आऊटमुळे मुंबईने हैदराबादचा (Mumbai Indians vs SRH) पराभव केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 17 एप्रिल : ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) आणि राहुल चहर (Rahul Chahar) यांच्या आक्रमक बॉलिंगमुळे मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादचा (Mumbai Indians vs SRH) 13 रनने पराभव केला आहे. बोल्ट आणि चहर यांनी हैदराबादच्या प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि कृणाल पांड्या यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. मुंबईच्या बॉलरनी या सामन्यात धमाकेदार बॉलिंग केली असली तरी हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) अफलातून फिल्डिंगमुळे मुंबईने सामन्यात पुनरागमन केलं. डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि अब्दुल समद (Abdul Samad) यांच्या रन आऊटमुळे मॅचचा निकालच पालटला. मुंबईने ठेवलेल्या 151 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली. जॉनी बेयरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 7.2 ओव्हरमध्येच 67 रन केले, पण जॉनी बेयरस्टो 22 बॉलमध्ये 43 रन करून हिट विकेट झाला. यानंतर डेव्हिड वॉर्नर हैदराबादला जिंकवून देईल असं वाटत होतं, पण पोलार्डच्या 12 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला विराट सिंग पॉईंटच्या दिशेने बॉल मारत एक रनसाठी धावला, त्यावेळी हार्दिकने डायरेक्ट हिट मारून वॉर्नरला माघारी पाठवलं. 34 बॉलमध्ये 36 रन करून वॉर्नर आऊट झाला.

जाहिरात

यानंतर 18 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर हार्दिकने पुन्हा त्याचा करिश्मा दाखवला. बोल्टच्या बॉलिंगवर अब्दुल समदने मिड ऑफच्या दिशेने बॉल मारला आणि एक रनसाठी धावला. तेव्हाही हार्दिकने डायरेक्ट हिटच मारूनच अब्दुल समदला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

यंदाच्या आयपीएल मोसमातला मुंबईचा हा सलग दुसरा विजय आहे. बँगलोरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शेवटच्या बॉलवर पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबईने आधी कोलकात्याचा आणि आता हैदराबादला धूळ चारली. या दोन विजयांसह आता पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात