• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • BREAKING : मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा बंगल्यात कोरोनाचा शिरकाव

BREAKING : मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा बंगल्यात कोरोनाचा शिरकाव


मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानात पुन्हा एकदा कोवीड १९ संसर्गाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानात पुन्हा एकदा कोवीड १९ संसर्गाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानात पुन्हा एकदा कोवीड १९ संसर्गाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे.

  • Share this:
    मुंबई, 15 नोव्हेंबर : राज्यात कोरोनाची (corona) लाट ओसरली आहे मात्र संकट अजूनही टळलेले नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या शासकीय निवास्थान असलेला वर्षा बंगला आणि मुख्यमंत्री कार्यालयात (cmo office) कोरोनाने शिरकाव केला आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानात पुन्हा एकदा कोवीड १९ संसर्गाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी OSD सुधिर नाईक यांची कोविड-19 संसर्ग चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची तात्काळ कोविड-19 संसर्ग तपासणी करण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचीही अधीक काळजी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानाचे सॅनिटायझेशन करण्यात आलंय. T20 World Cup : एरॉन फिंच, एमएस धोनी आणि दुबई.... तिघांमध्ये आहे खास कनेक्शन! याआधीही मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी  कोरोनाने शिरकाव केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती.  कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना सुद्धा 20 तारखेला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रश्मी यांची चाचणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी कोरोनावर मात केली होती.
    Published by:sachin Salve
    First published: