टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) पराभव केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. याआधी कांगारूंनी पाचवेळा वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 8 विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर भारताचा बॉलर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) ऑस्ट्रेलिया, चेन्नई सुपर किंग्स आणि दुबईमध्ये शानदार कनेक्शन सांगितलं.