मुंबई, 03 डिसेंबर : नायर हॉस्पिटलमध्ये (Mumbai Nair Hospital) उपचाराअभावी 4 महिन्यांच्या बाळाच्या मृत्यू प्रकरणावरून मुंबई महापालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation) सभागृहात शिवसेना (shivsena) आणि भाजप (bjp) नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. दोन्ही पक्षाचे नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.
नायर हॉस्पिटलमध्ये बाळाच्या मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार गोंधळ घातला. नायर हॉस्पिटलमध्ये उपचाराअभावी ४ महिन्यांच्या बाळाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. हे बाळ त्याच्या परिवारासहित वरळीतील सिलेंडर ब्लास्ट घटनेत जखमी झाले होते. यावरुन भाजप नगरसेवकांनी आरोग्य समितीचा राजीनामा दिला. यावर बोलताना सेनेचे नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधवांनी भाजपचे लोकं राजीनामा देतात आम्ही सेनेचे मात्र लढतो, असे वक्तव्य केलं.
यावरुन भाजप नगरसेवक चिडले आणि सेना-भाजपचे नगरसेवक आमनेसामने आले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनाही भाजप नगरसेवकांनी घेरले.
केएल राहुलने आथियाच्या भावासोबत शेयर केला PHOTO, पण कॅप्शनमुळे झाला ट्रोल!
नायर रुग्णालयात डॅाक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला यावर चर्चा सुरू असताना यशवंत जाधव यांनी राजकारण सुरू केलं. भाजपच्या लोकांनी रूग्णालयात भेट दिली हे त्यांना झोंबलं. आमच्या ११ नगरसेवकांनी आरोग्य समितीत राजीनामा दिला हे त्यांना झोंबले आहे, अशी टीका भाजपचे नेते भालचंद्र शिरसाठ यांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
वरळीतील गणपतराव जाधव मार्गावर स्थित कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये काल सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. यामध्ये चार महिने वय असलेल्या एका बाळासह पाच वर्षे वयाचा मुलगा, एक महिला (वय वय 25) आणि एक पुरुष (वय 27) असे चौघे जण भाजले होते. संबंधित घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महानगरपालिकेचं अग्नीशमन दल, विभाग कार्यालयातील यंत्रणा तसेच पोलीस यांनी मदतकार्य करुन चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण नायर रुग्णालयात या जखमींच्या उपचारामध्ये दिंरगाई करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या संबंधिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओतील डॉक्टर आणि पारिचारिकांची असंवेदनशीलता पाहून काळीज पळवटून जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP