मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लग्नापूर्वी काही तास नवरदेवच झाला गायब, वाट पाहून वधूने केली तक्रार; गूढ कायम

लग्नापूर्वी काही तास नवरदेवच झाला गायब, वाट पाहून वधूने केली तक्रार; गूढ कायम

लग्नासाठी वधूच्या गावी वऱ्हाड निघायला काही मिनिटं बाकी असताना नवरदेव घरातून पळून गेल्यामुळे गोंधळ उडाला.

लग्नासाठी वधूच्या गावी वऱ्हाड निघायला काही मिनिटं बाकी असताना नवरदेव घरातून पळून गेल्यामुळे गोंधळ उडाला.

लग्नासाठी वधूच्या गावी वऱ्हाड निघायला काही मिनिटं बाकी असताना नवरदेव घरातून पळून गेल्यामुळे गोंधळ उडाला.

जयपूर, 3 डिसेंबर: लग्नाच्या पूर्वी काही मिनिटं नवरदेवच गायब झाल्यामुळे ठरलेल्या (Groom run away before marriage) वेळी वरात आली नाही. त्यामुळे काळजीत पडलेल्या वधूकडच्या मंडळींनी चौकशी केली. त्यांना जी माहिती समजली, ती ऐकून त्यांना (Shocked to know the fact) जबर धक्का बसला. लग्नासाठी वऱ्हाड निघण्यापूर्वी काही मिनिटं नवरदेवच गायब झाला. काही कारण सांगून तो बाहेर गेला आणि (Groom not returned) परत घरीच आला नाही.

नवरदेवाचा शोध

लग्नासाठी वधूच्या गावी वऱ्हाड निघायला काही मिनिटं बाकी असताना नवरदेव घरातून पळून गेल्यामुळे गोंधळ उडाला. राजस्थानच्या झुंझुनू भागात रवी कुमार नावाच्या तरुणाचं लग्न ठरलं होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. काही वेळातच नवरदेवाला घेऊन वऱ्हाड येईल आणि थाटामाटात लग्न पार पडेल, या तयारीत वधूकडील मंडळी सज्ज होती. रवीच्या घरीदेखील सर्व तयारी पूर्ण झाली होती. पाहुणेमंडळी जमली होती आणि काही वेळातच घरातून वधूच्या घरी प्रस्थान होणार होतं.

नवरदेव पडला बाहेर

वऱ्हाड निघण्यापूर्वी काही वेळ नवरदेव रवी घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडला. थोड्याच वेळात परत येतो, असं सांगून तो बाहेर गेला खरा, मात्र वऱ्हाड निघण्याची वेळ झाली तरी परतला नाही. काही वेळ घरच्यांनी आणि पाहुणेमंडळींनी त्याची वाट पाहिली. मात्र बराच वेळ उलटूनही तो न आल्यामुळे सर्वांना चिंता वाटू लागली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत रवी हरवल्याची तक्रार दिली.

पोलिसांनी लावला शोध

पोलिसांनी आपली सूत्रं कामाला लावत रवीचा शोध घ्यायला सुरुवात केली. राजस्थानमधून रवी हा हरियाणात गेल्याचं पोलिसांना समजलं. तिथून त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि पुन्हा आपल्या गावी आणण्यात आलं. रवीनं असं का केलं, याचं कारण पोलिसांनी अद्याप उघड केलेलं नाही. प्रेम्रप्रकरणातून त्याने हा प्रकार केला असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र त्याची खातरजमा पोलिसांनी केलेली नाही.

हे वाचा - 2 हजार रुपयांसाठी तरुणाला गाडीखाली चिरडून ठार मारले, वर्ध्यातील संतापजनक घटना

वधूने केली तक्रार

वाट पाहूनही वरात न आल्यामुळे वधूकडील मंडळीदेखील चिंताग्रस्त झाली. मात्र नवरदेव जाणूनबुजून घरातून निघून गेला होता, हे समजल्यावर त्यांच्याही रागाचा पारा चढला. वधूने रवीविरोधात लग्नाचं आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी काहीही माहिती देत नसल्यामुळे या प्रकरणातलं गूढ अधिकच वाढलं आहे.

First published:

Tags: Bride, Bridegroom, Crime, Marriage