Home /News /mumbai /

BREAKING : भाजपकडून राज्याला 50 हजार remdesivir injection देण्याची घोषणा

BREAKING : भाजपकडून राज्याला 50 हजार remdesivir injection देण्याची घोषणा

भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी दमन येथे जाऊन ग्रुप फार्मा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला (Group Farm Pvt. Ltd. daman) भेट दिली.

    मुंबई, 12 एप्रिल : राज्यात कोरोनावर (Corona) उपचारासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचा (remdesivir injection) मोठा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी पायपीट होत आहे. तर दुसरीकडे, भाजपने (BJP) महाराष्ट्राला 50 हजार रेमडीसीवीर इंजेक्शन देण्याची घोषणा केली आहे. एवढा मोठा इंजेक्शनचा साठा वाटप करण्यास केंद्राकडून परवानगी मिळाली आहे. भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी दमन येथे जाऊन ग्रुप फार्मा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला (Group Farm Pvt. Ltd. daman) भेट दिली. या कंपनीकडून मोठा इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला आहे.  भाजपकडून राज्याला  50,000 रेमडेसीवीर इंजेक्शनची देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तुम्हाला माहित आहे की तुम्ही रात्रभर करोडपती बनू शकता? 'महाराष्ट्र माझा, जिम्मेदारी देवेंद्र फडणवीस यांची' अशा भावनेतून आम्ही काम करणार आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रेमडेसीवीर उपलब्ध करण्यासाठी काही कंपन्यांशी बोलत चर्चा केली आणि भूमिका घेतली. त्यातून ग्रुप फार्मा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत चर्चा केली. अंशू ग्रुप फार्मशीने  महाराष्ट्राला लागेल तितकं रेमडेसीवीर देण्याच आश्वासन केलं आहे, अशी माहिती दरेकर यांनी दिली. तसंच, आरोप, प्रत्यारोप खेळ करण्यापेक्षा आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात वेळ घालवला असता तर ही वेळ आली नसती, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. कोणताही काळाबाजार न होता महाराष्ट्रात रेमडीसीवीरचा वाटप करणार आहोत. देशभरात वाटप करण्यासाठी परवानगी पत्र दिलं आहे, असंही दरेकर यांनी सांगितले. दीपिकाच्या फोटोवर प्रियांकानं उधळली स्तुतीसुमनं; म्हणाली, ‘असा फोटो...’ दरम्यान, दमण येथूनच दरेकर यांनी अन्न व औषध प्रशासनाचे सचिव सौरभ विजय याना दोन वेळा फोन करून माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना दोन-तीन वेळा फोन केल्यानंतर त्यांनी फोन घेतला. 'ग्रुप फार्मा ही कंपनी 50 हजार रेमडेसीवीर उपलब्ध करून देण्यास तयार आहे, कृपया या कंपनीशी राज्यसरकार म्हणून आपण संपर्क साधावा, अशी विनंती दरेकर यांनी केली. पण त्यांनी कंपनीशी संपर्क साधण्यास नकार देऊन त्या मालकांना आम्हाला संपर्क करण्यास सांगा, असे दरेकर यांनी सांगितले.  राज्य संकटात असताना, रुग्णांचे रेमडेसीवीरशिवाय प्राण जात असताना, राज्याची गरज असताना सरकारच्या, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या असंवेदनशील वृत्तीबद्दल दरेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून ते आज मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांशी याबाबत बोलणार आहेत. तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार,   ग्रुप फार्म ही कंपनी फक्त एक्स्पोर्ट लायसन्स धारक आहे. एक्स्पोर्ट करणाऱ्या कंपनीचा साठा सध्या पडून आहे.  या कंपनी ला देशनतर्गत विक्री करायची असेल तर तिला केंद्र सरकारची मंजुरी लागत असते. केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यावर केंद्र सरकार राज्याला किंमत आणि लेबलिंग करण्याचे अधिकार देईल. त्यानंतर  राज्यसरकार निर्णय घेईल.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, भाजप

    पुढील बातम्या